Follow me on Twitter- https://twitter.com/doc_chinmay

Tuesday, July 22, 2008

'कम्युनल' विरोधाच्या नावाखाली चालणारा संधिसाधुपणा

भारत देशात जरी हिंदु बहुसंख्य असले तरी त्यांच्यासाठी बोलणारा 'कम्युनल' म्हणजे सांप्रदायिक ठरतो.आणि हे ठरवणारे म्हणजे भारतातील बहुतांश धर्मनिरपेक्ष पक्ष आणि धर्मनिरपेक्ष पत्रकारीता.पण जर का याचा नीट अभ्यास केला तर अस दिसुन येत की सांप्रदायिक शक्तींना विरोधाचे कारण पुढे करुन प्सुडोसेक्युलर पक्ष संधिसाधुपणा करतात्.यामधे अनेक उदाहरणे देता येतील्.सध्याचच सगळ्यात गाजणार उदाहरण म्हणजे समाजवादी पक्ष्.

समाजवादी हा मुळात मुस्लिम लोकांमधे प्रसिध्द असलेला पक्ष्.या पक्षातील नेत्यांनी हिंदुंवर कारसेवा करायला गेले म्हणुन गोळ्याही झाडल्या होत्या.मागच्या लोकसभेच्या निवडणुकांपुर्वी 'आम्ही ज्यांना पाठींबा देउ तेच सरकार बनवतील' अशा थाटात यांचे मुलायम सिंग आणि अमर सिंग वावरत होते.पण निकालांनंतर चित्रच पालटल.कधी नव्हे ते कम्युनिस्टांचे ५२ खासदार निवडुन आले आणि त्यांनी काँग्रेसला बिनशर्त पाठींबा दिला.त्यांच्या व इतर युपीए च्या घटक पक्षांच्या आधारे सरकार बनणार हे स्पष्ट झाल्यावर समाजवादीच्या नेत्यांनी केलेल्या वल्गना खोट्या ठरल्या आणि त्यांच्याशिवायच सरकार बनु लागले.मग अमर सिंग तरीही काँग्रेसच्या स्नेहभोजनाला 'बिनबुलाये मेहमान' बनुन गेले.आधीच सरकार येणार हे स्पष्ट झाल्याने सोनिया मॅडम निश्चिंत होत्या त्यांनी सरळ सरळ 'अमर सिंग येथे काय करत आहेत??' म्हणुन त्यांना जवळपास हाकलुन दिले.त्यानंतर अगदी मागच्या वर्षीपर्यंत अमर सिंग 'काँग्रेसनी आमचा कसा अपमान केला' हे सांगत फिरत होते.पण मायावतींनी त्यांचा फडशा पाडल्यावर मात्र त्यांना महत्व मिळत नव्हते.आणि शेवटी अणुकरारावरुन डाव्यांनी सरकारचा पाठींबा काढल्यावर लगेच तेच अमर सिंग सोनिया व इतर काँग्रेस नेत्यांकडे फेर्‍या मारुन भाव खाउ लागले.आणि कारण सांगताना सांगु लागले की 'कम्युनल' पक्षांना सत्तेपासुन दुर ठेवण्यासाठी आम्ही सरकारला पाठींबा देत आहोत्.त्याचबरोबर कम्युनल आडवाणींपेक्षा बुश बरे अशीही टुम सध्या उडवत आहेत्.पण या सर्व निरर्थक गोष्टी आहेत हे तेही जाणतात आणि आपणही जाणतो.मुळात बसपचा 'हत्ती' अडवण्यासाठी काहीतरी करणे आवश्यक आहे म्हणुन समाजवादीने केलेला हा संधिसाधुपणा आहे.राष्ट्रीय पटलावर आपल महत्व दाखवुन देण्याचा प्रयत्न आहे.यात कम्युनल विरोध कुठेच नाही.मुलायम सिंग युपीच्या निवडणुका हरल्यावर अनेक कार्यक्रमात सांगत फिरत होते की 'राजकारणात कुणीही कायमचा शत्रु अथवा मित्र नसतो'.हे वाक्य सगळ काही सांगुन जात्.म्हणजे वेळ आली तर आम्ही काँग्रेसबरोबरच काय तर भाजपबरोबरही युती करु शकतो असे यात स्पष्ट होते.मग कम्युनल विरोध आलाच कुठुन???

दुसरा संधिसाधु पक्ष म्हणजे करुणानिधींचा द्रविड मुन्नेत कळघम म्हणजे 'द्रमुक'.यांचा संधिसाधुपणा तर फारच स्पष्ट आहे. हिंदुंना 'चोर' म्हणणार्‍या आणि आयुष्यभर हिंदुविरोध करणार्‍या या पक्षाने मागच्या वेळी त्यांच्याच वैचारीक शत्रु असलेल्या भाजपला पाठींबा दिला.आणि गेले ४ वर्ष तेच भाजपाला पाठींबा देणारे करुणानिधी आता म्हणतात की 'भाजपसारख्या सांप्रदायिक पक्षांना दुर ठेवण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र याव्.कम्युनल पार्ट्या हिंदु मुस्लिम एकीसाठी मारक आहेत्'.आता कम्युनलविरोधाचा मुखवटा चढवुन द्रमुक त्यांच्या कट्टर विरोधी असलेल्या काँग्रेसशी युती करुन आहे.भारतीय राजकारणात सर्वाधिक विरोधाभास असलेली ही युती आहे.राजीव गांधीची हत्या करणार्‍या 'एलटीटीइ'ला द्रमुकचा पाठींबा होता आणि अजुनही तो पाठींबा आहे असे म्हणायला वाव आहे.मुळात राजीव गांधी हत्येची चौकशी करणार्‍या जैन आयोगाने 'द्रमुक नेतृत्वावर कायदेशीर आरोप ठेवणे शक्य आहे' असा अहवाल दिल्यानंतर काँग्रेस्-द्रमुक युती व्हायची शक्यताच निर्माण व्हायला नको होती.द्रमुकचा जन्म जिच्यापासुन झाला ती जस्टिस पार्टी काँग्रेसची स्वातंत्र्यलढ्यात कडवी विरोधक होती.काँग्रेस स्वातंत्र्यासाठी चळवळ करत होता तेंव्हा ही पार्टी ब्रिटीशांना समर्थन देत होती,काँग्रेसने सरदार पटेलांच्या नेतृत्वाखाली देश एकसंध ठेवला होता तेंव्हा द्रमुक 'द्रविडनाडु' या देशाची मागणी धरुन होता,काँग्रेसने हिंदी भाषा राष्ट्रभाषा असावी म्हणुन महात्मा गांधींपासुन तशी भुमिका घेतली होती तेंव्हा कट्टर हिंदीविरोधाचे नेत्रूत्व द्रमुक करत होता,राजीव गांधींनी श्रीलंकेत शांतीसेना पाठवली त्याकाळात तर द्रमुक लंकेतील तामीळींसाठी चिडला होता.इतका प्रचंड विरोधाभास असलेली द्रमुक-काँग्रेस युतीही 'कम्युनल्'ला सत्तेपासुन दुर ठेवण्यासाठी झाली.पण ही करताना (तसे सांगताना तरी),त्याच कम्युनल भाजपबरोबर आपण ५ वर्ष सरकारात राहीलेलो आहोत हे द्रमुक विसरतो.

देवेगौडांचे सेक्युलर जनता दल तर संधिसाधुपणा लपवायचाही प्रयत्न करत नाहीत्.आपण कधी इकडे तर कधी तिकडे अशी सततची पळापळ करुन आपल्याला कुठलीही वैचारीक बैठक नाही हे त्यांचा पक्ष दाखवुन देत असतो.आत्ता परवाच एकाच दिवशी युपीए बरोबर आणि युपीए विरोध्यांबरोबर देवेगौडा दिसले होते.यांनी काँग्रेसबरोबर युती करुन धरम सिंग यांचे सरकार कर्नाटकात आणले आणि मग लगेच ते पाडुन भाजपाबरोबर सरकार आणले.त्यांचा मुलगा २० महीने मुख्यमंत्री आणि पुढचे २० महीने भाजपचा मुख्यमंत्री असेल असे ठरले.पण स्वतःचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाल संपल्यावर कारभार भाजपकडे सोपवण्यास गौडांनी नकार दिला मग परत काँग्रेसबरोबर जायचा प्रयत्न केला आणि ते जमत नाही म्हणुन परत भाजपला पाठींबा दिला आणि ७ दिवसात तो काढुनही घेतला.हे सगळ करत असताना आपला संधिसाधुपणा उघडा पडतोय याचीही त्यांना चिंता नव्हती.मग देवेगौडांनी मुलाचा निर्णय होता असे म्हणुन सारवासारव केली. हे सर्व होतानाच आपल्या पक्षाचे नाव सेक्युलर आहे म्हणुन कम्युनल राजकारणाचा विरोधही ते अधुनमधुन करतात्.पण काहीच दिवसात परत ते भाजपबरोबर युती होउ शकते असेही सांगतात. आत्ताच काही दिवसांपुर्वी 'केंद्रात भाजपबरोबर युती होउ शकते' असेही त्यांनी स्पष्ट केले आणि हे केल्यानंतर काहीच दिवसात दिल्लीचे वारे पलटले आणि त्यात आपणही बातम्यांमधे याव म्हणुन धर्मनिरपेक्षांचा पंगतीत जाउन देवेगौडा परत बसले आहेत.

या सर्वांपेक्षा मायावतींची बहुजन समाज पार्टी तरी बरी.कारण ते सरळ सरळ हे मान्य करतात की 'आम्ही संधिसाधु आहोत.फायद्यासाठी आम्ही कुणाबरोबरही जाउ'.संसदेत एकदा कांशीराम म्हणाले होते की 'आम्ही संधिसाधु आहोत असे तुम्हीच म्हणता आणि वरुन आम्ही भाजपबरोबर गेलो म्हणुन टिकाही करता.मग तुम्हीच सांगा की आम्ही कुणाबरोबर जाव की ज्यामुळे आमचा फायदा होईल?'.जुन्या काळी मनुवादी म्हणुन ,कम्युनल म्हणुन ज्यांच्यावर टिका बसपने केली,त्यांच्याच बरोबर बसपने अनेकदा युतीही केली.सध्या पक्ष देशभरात वाढवण्यासाठी मायावती प्रयत्न करत आहेत्.ते करण्यासाठी वेळ पडल्यास 'कम्युनल' पक्षांशी युती करतील आणि वेळ पडल्यास त्यांना 'कम्युनल' आहेत म्हणुन विरोधही करतील्.बाकी युपीए सरकारला बाहेरुन पाठींबा देताना उत्तर प्रदेशच्या विकासाबरोबर जातीयवाद्यांना विरोध हाही मुद्दा होताच की!सध्या मायावती देशात युपिबाहेर सगळीकडे स्वतःचे उमेदवार उभ्या करत आहेत आणि याचा फायदा अप्रत्यक्षपणे भाजपाला होतोय.कारण त्या काँग्रेसचा मतदार स्वतःकडे खेचत आहेत.गुजरातमधे १५-१६ काँग्रेसचे मतदार त्यांनी घरी बसवले तर कर्नाटकात १०-११ काँग्रेसचे उमेदवार त्यांच्यामुळे हरले.अनेकदा भाजपबरोबर युती करणार्‍या आणि नरेंद्र मोदींसारख्या कट्टर हिंदुत्ववाद्याच्या प्रचारासाठी सभा घेणार्‍या मायावती राष्ट्रपतीपदासाठी काँग्रेस उमेदवाराला पाठींबा देताना म्हणाल्या की 'भाजपला पाठींबा देण्याचा प्रश्नच येत नाही कारण ते कम्युनल आहेत.कम्युनल पक्षांना कुठल्याही प्रकारे मदत व्हायला नको म्हणुन बसपने नेहमीच लढा दिलेला आहे'.असे असले तरी त्यांनी संधिसाधुपणा मान्य केलाय हे तरी ठिक आहे.

बाकी एका दृष्टीने राष्ट्रवादीवरही हा आरोप ठेवला जाउ शकतो.कारण सोनियांच्या परदेशी मुळाचा मुद्दा घेउन राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर काहीच महीन्यात महाराष्ट्रात त्यांनी काँग्रेसशी युती केली आणि सरकार बनवले.ते करताना 'राष्ट्रिय स्तरावर हे होणार नाही 'हे सांगितले आणि मग हळुहळु पवार भाजपकडे झुकु लागले.वाजपेयींचा उघड गौरव करु लागले.मग काही जागांवरुन बोलणी फिस्कटल्यावर पवारांनी सोनियांच्या काँग्रेसबरोबर लोकसभेसाठी निवडणुकपुर्व युती केली.मग त्यांच्या सरकारातही ते सामील झाले.'सोनिया पंतप्रधान आमच्याशिवायच होतील म्हणुन आम्ही त्यांना पाठींबा देतो' असे पवारांनी सांगितले.आणि हे केल्यानंतर सोनियांनी पंतप्रधानपद नाकारले.त्यानंतर काहीच महीन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होत्या.त्यात शरद पवारांनी असेही सांगितले की 'सोनिया पंतप्रधान होणार नाहीत हे स्पष्ट झाल्यावर कृषीमंत्रीपद स्विकारले'.पण हे करत असताना 'डबल कम्युनल' शिवसेनेशी ते संबंध ठेवुन आहेत्.पुण्यात त्यांची सेनेशी युतीही आहे.

याप्रमाणे प्सुडोसेक्युलर कम्युनलच्या नावाखाली संधिसाधुपणा करतात्.तर या कम्युनल पक्षांचा इतका खरच दोष आहे का???आणि खरच हे पक्ष कम्युनल आहेत का हा प्रश्न कोणीच विचारत नाही.महाराष्ट्रात तर सेना-युती शासनाच्या वेळी सांप्रदायीक दंगे जवळपास झालेच नव्हते.नरेंद्र मोदींना धर्मनिरपेक्ष लोक शिव्या देत असतात पण १९६९ साली गुजरातमधे २००२ सालपेक्षा कितीतरी मोठी दंगल उसळली होती हे विसरतात्.अनेक दंगली धर्मनिरपेक्ष सत्तेवर असताना झाल्या आहेत तरीही शिवसेना-भाजप सारखे पक्ष सत्तेत आल्यास अराजक माजेल असे एक चित्र निर्माण केले जाते जे साफ चुकीचे आहे.मुळात हिंदुंवरील अन्याय आणि हेटाळणी बंद केली तर आपोआपच या पक्षांचा जनाधार कमी होईल्.पण हे लक्षात न घेता धर्मनिरपेक्ष पक्ष सत्तेत येताच हिंदुविरोध सुरु करतात्.रामसेतुचा मुद्दाही त्यातलाच्. भाजप्-शिवसेना या पक्षांना कम्युनल म्हणने कितपत बरोबर आहे हाही एक मुद्दा आहेच्.धर्मांध मुस्लिम देशविरोधी कारवाया करु शकतो म्हणुन त्यांच्या धर्मांधतेला आळा घालण्याची मागणी कम्युनल कशी ठरते??एका दृष्टीने बघितल्यास कम्युनला शक्तींना सत्तेपासुन दुर ठेवण्याच्या नावाखाली प्सुडोसेक्युलर संधिसाधुपणा करतात्.त्यामानाने शिवसेना-भाजप युती गेले २० वर्ष एका मुद्द्याच्या जोरावर टिकुन आहे.अनेकदा त्यांच्यातले संबंध ताणले गेले पण सत्तेसाठी संधिसाधुपणा करण्यासाठी त्यांनी त्यांच्या तत्वांशी तडजोड टाळली आहे.