Follow me on Twitter- https://twitter.com/doc_chinmay

Thursday, May 1, 2008

खात्रीत स्वातंत्र्य

'Certainty is freedom.....' म्हणजेच 'खात्रीत स्वातंत्र्य आहे...'
'पुढील १०० वर्ष व्यवस्थित रहाता येईल अशी माझी खात्री झाली की मी स्वतःला सुरक्षित मानील्'...... नंदन निलेकणी
एकुणच आजच्या जगात आपण खात्री शोधत असतो.पण हळुहळु जगात खात्रीदायक काहिच राहिलेल नाहिये. पुर्वी लोकांना पगार मिळत असे तोही खात्रीदायक्,त्या पगारात काय काय मिळेल हेही खात्रीदायक असे. निवृत्तीनंतर पेन्शन मिळेल याचीही खात्री असेच. पण आता तसे नाही.सर्व गोष्टींच्या किमती वाढतच आहेत आणि काहीकाही तज्ञ म्हणतात की त्या वाढणारच आहेत.१० वर्षापुर्वी जो पगार चांगला मानला जायचा तो आता कमी वाटू लागलाय.कम्पन्यांमधे पेन्शनही नसत्.आणि चिदंबरमबाबा तर म्हणत आहेत की सरकारी नोकरीवाल्यांच पेन्शनही कधी ना कधी बंद होणार आहे.घराच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत्.अजुन १०-१५ वर्षांनी पुण्या-मुंबईत घर घेण तरी शक्य होईल का नाही कोण जाणे.अर्थव्यवस्था वाढतेय्.डॉलर कमी होतोय तेंव्हा डॉलर अजुन कमी झाल्यास २०लाख लोक बेकार होतील असेही मंत्री म्हणत आहेत्.अर्थव्यवस्था वाढल्याने अजुन १०-१५ वर्षांनी म्हणे आयटी कम्पन्या भारतातुन पळ काढतील कारण भारतातला रोजगार त्यांना परवडणार नाही.गल्फ देशांमधे तसच झाल होत म्हणे. व्यवसाय करत असाल तर त्यातही फारशी खात्री नाही.उद्या मल्टीनॅशनल कम्पन्या कुठल्या क्षेत्रात घुसतील सांगता येत नाही.आणि त्या जिथे घुसतील तिथे छोट्या-मोठ्या उद्योजकांना पैशाच्या जोरावर संपवतील.ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगाच्या तापमानात बदल होत आहे.तज्ञ म्हणत आहेत की आपल्याला आपला ग्रह वाचवायला काहीच वर्षे राहीलेली आहेत.आत्ताच काही केले नाही तर विनाश अटळ आहे.सार्‍या जगाला केवळ सहा ते आठ आठवडे पुरेल इतकेच खाद्यान्न भूतलावर शिल्लक आहे. जगाच्या राजकारणात समस्या कमी होण्याऐवजी क्लिष्ट होत आहेत.एकुणच परिस्थिती इतकी चिंताजनक आहे की कशाचीही खात्री नाही.
मग कशाचीच खात्री नाही तर स्वातंत्र्य कसल्???इथे स्वातंत्र्य म्हणजे काहीही खा-प्या,कसेही वागा,काहीही विचार करा अशा अर्थानी नाहीये. अथवा पर्यायी शब्द सापडला नाहीये म्हणा(कुणाला माहीत असल्यास कळवावा).
पण या जगात खात्रीदायक काहीच नाही हाच तर या जगाचा नियम आहे.उद्या काय होईल हे सांगता येण कठीण आहे.मग या खात्रीत स्वातंत्र्य शोधायच कशाला??या जगात खात्रीदायक काहीही नाही , हे जाणुन त्यातच स्वातंत्र्य मानणाराच खरा हुशार म्हणावा लागेल.थोडक्यात म्हणजे उद्या काय होईल याचा विचार करण्यात आज वाया घालवुन उपयोग नाही. ते म्हणतात ना की 'भुतकाळ हा बाउंस झालेला चेक आहे,भविष्यकाळ हा पोस्ट्डेटेड चेक आहे आणि फक्त वर्तमानकाळ हीच तुमच्याकडे असलेली रोख रक्कम आहे जिचा तुम्हाला काहीतरी उपयोग आहे'.उद्या काय होईल याचा फार विचार केला की टेन्शन येत्.मुळात टेन्शन म्हणजेच आज सोडुन उद्याचा विचार करण आहे.anxiety म्हणजे वर्तमानात राहुन भविष्यात रहाण आहे.काहीकाहींच्या मते अशा परिस्थितीत कामं चांगली होतात पण मला वाटत की चिंतामुक्त वातावरणात होणारे काम सर्वोत्कृष्ठ असते.कारण टेन्शनमधे केलेले काम हे फक्त जितकी गरज आहे तितकेच असते.शेवटी चिंता हीही एक प्रकारची भितीच असते.भितीमधे स्वातंत्र्य नसतेच.त्यामुळे आज ,आत्ता मधे जगण्याचा प्रयत्न करणेच सर्वोत्तम.

4 comments:

Anonymous said...

hmm Good Thinking & Observation

-Swanand Kulkarni

Anonymous said...

nice blog chinmay but ajchyapeksha udya changala asel yach ashene apan jagato na,mag tihtehi futurecha vichar yetoch,tar ha vichar kasa kadhun taknar?

Anonymous said...
This comment has been removed by a blog administrator.
Dr.Chinmay Kulkarni said...

vichar purnapane kaadha ase mhatalele naahiye.mi fakt mhanatoy ki udyacha faar tension na ghetaa kaam karaayachaa prayatn karaa.arthaatach he avaghad aahe.malaahi jamata asa naahi.