Follow me on Twitter- https://twitter.com/doc_chinmay

Tuesday, May 13, 2008

राजसमर्थक राजु परुळेकर यांस ,

तुम्ही तुमच्या लेखात आंबेडकर्,अत्रे यांचे वारसदार दिवाळखोर निघाले म्हटले आहे.आंबेडकरांचे राहु द्या पण अत्र्यांचे वारसदार म्हणजे आजचे पत्रकार तर नंबर एकचे दिवाळखोर आहेत.एव्हढेच नव्हे तर 'पत्रकार धर्म' विसरुन राजकीय कंपुबाजीत सगळे धन्यता मानत आहेत. राजु परुळेकरही त्यातलेच.अत्र्यांनी त्यांच्या वृत्तपत्रातुन सतत मराठीचा मुद्दा धगधगत ठेवला.पण राजु परुळेकर मायावाती,मोदी व इतर अनेकविध विषयांवर आपली मते मांडत होते.-------------------------------------------------------


राजसमर्थक राजु परुळेकर यांस ,
आपला लोकप्रभातील 'होय हा महाराष्ट्र धर्म आहे ' हा 'अविचार' वाचला.लेख इथे वाचा -http://www.loksatta.com/lokprabha/20080509/maha.htm
लेखामधील अनेक गोष्टी बरोबर आहेत (ज्याचा मी विरोध करत नाही).अतिशय अभ्यासपुर्ण काही मुद्दे मांडले आहेत उदा.बाबासाहेब आंबेडकरांचे मुद्दे. पण ८ बरोबर मुद्द्यांमधे २ निव्वळ चुकिचे तपशील घुसवुन तेही अभ्यासपुर्ण आहेत असे भासवुन दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला आहे.मला ७०% लेखात चुक वाटत नाही.काँग्रेस नेत्यांबद्दल लिहिलेल्या गोष्टीही बरोबर आहेत.पण शिवसेनेवर केलेल्या आरोपांमधे तर निव्वळ द्वेशभावना दिसते. शिवाय सर्वात मोठा आक्षेप(जो आजकाल जवळपास सगळ्याच पत्रकारांबाबत आहे)तो म्हणजे 'राजकीय कंपुबाजी'.

तुम्ही एक वाक्य लिहिल आहे की '१९९० पासुन शिवसेनेनी महाराष्ट्र धर्माच जेव्हढ नुकसान केल आहे तेव्हढ काँग्रेसनीही केलेल नाहि'.तुमच म्हणन अस आहे की शिवसेनेनी हिंदुत्व भैय्यांसाठी पत्करल.बाळासाहेबांनी सत्तेसाठी ड्रेस बदलला. याबद्दल मी सांगु इच्छितो की बाळासाहेबांनी पुर्वीपासुनच धर्मांध मुस्लिमांविरुध्द भुमिका घेतलेली आहे. आर्.के. करंजिया यांच्या त्या काळातील प्रसिध्द 'ब्लिट्स' या साप्ताहीकाने बाळासाहेबांच्या नेहमीच्या मुस्लिम व कम्युनिस्ट विरोधी भुमिकेमुळे त्यांच्यावर अनेकदा तिखट हल्ले केले होते. बाळासाहेबांनी १९८० मधे म्हटल होत की "They [Muslims] were spreading like a cancer and should be operated on like a cancer. The...country should be saved from the Muslims and the police should support them [Hindu Maha Sangh] in their struggle just like the police in Punjab were sympathetic to the Khalistanis". १९७२ साली ए.सी.भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांनी मुंबईतील इस्कॉन मंदिरावर होणार्‍या हल्ल्याविरुध्द बाळासाहेब ठाकर्‍यांकडे मदत केली होती. प्रभुपादांच्या चरित्र ग्रंथात बाळासाहेबांचा उल्लेख 'हिंदु अधिकारांसाठी लढणार्‍या नेत्यांमधील मुंबईतील सर्वात मोठा नेता' असे आहे.

तुम्ही पुढे असेही लिहिता की "हिंदुत्वाचे तुणतुणे वाजवुन शिवसेनेनी महाराष्ट्राची उर्जा दिल्ली,भैयांच्या सरंजामशाही अर्पित केली". शिवाय तुम्ही संघालाही विरोध केलेला आहेच म्हणजे एकुणच हिंदुत्व म्हणजे 'उत्तर भारतीयांपुढील लाचारी' असा तुमचा गैरसमज झालेला दिसतो.तुम्हाला मी सांगु इच्छितो की हिंदुत्व ही संकल्पनाच मुळात महाराष्ट्राने दिलेली आहे. हिंदुत्वाचे प्रेरणास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे मराठीच होते तर वासुदेव बळवंत फडकेही(father of militant nationalism and Hindutva) मराठीच होते.स्वातंत्र्यवीर सावरकरांपासुन ते हेगडेवारांपर्यंत आणि गोळवलकर गुरुजींपासुन बाळासाहेब ठाकर्‍यांपर्यंत हिंदुत्वाचे महत्वाचे नेते मराठी आहेत. लोकमान्य टिळकांनाही हिंदुत्वाचे पितामह म्हटले जाते तर तुम्ही उल्लेख केलेल्या प्रबोधनकार ठाकर्‍यांनीही 'हिंदुत्व' नावाचे पुस्तक लिहिले होते,जातीपातींच्या सीमा गाडण्यासाठी अनेक अनिष्ट प्रवृत्तींवर प्रखर टिका केली होती व त्याचप्रमाणे प्रबोधनकारांनी ख्रिश्चन मिशिनरीजच्या धर्तीवर हिंदु मिशिनरिज बनवाव्यात अशी संकल्पनाही मांडली होती.तर अशा अनेक थोर मराठी व्यक्तिमत्वांनी(बाळासाहेब ठाकरे वाचु नका) हिंदुत्व देशाला दिले.या महान लोकांच्या भुमिकेला विरोध करणे म्हणजे महाराष्ट्र धर्मालाच विरोध करणे आहे. या लोकांनी काय हिंदुत्व भैय्यांसाठी केले काय??

हिंदुत्वानीच मराठी माणुस दिल्लीवर वर्चस्व ठेवु शकतो असे मला वाटते.मागे एनडीए सरकारने काही निर्णय घेतल्यावर काँग्रेस व धर्मनिरपेक्ष पक्षांनी म्हटले होते की 'हे सरकार दिल्लितुन नाही तर नागपुर,पुण्यातुन चालते'. बाळासाहेबांनी घेतलेल्या प्रखर भुमिकेमुळे दिल्लीही हादरत असे.एक-दोन उदाहरण देतो.वाजपेयी सरकार पाकीस्तानशी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेउ लागले तेंव्हा शिवसेनेनी मुंबईतील वानखेडे स्टेडीयमचे पिच खोदले व 'मुंबईत सामना होउ देणार नाही' असे बजावले. वाजपेयींना भुमिका बदलावी लागली. दिल्ली महाराष्ट्रापुढे बिनशर्त झुकली.फारुख अब्दुल्लांच्या 'नॅशनल काँफरन्स्'ने एनडिए सरकारला पाठिंबा दिला व फारुक अब्दुला राष्ट्रपती बनवावेत अशी अट ठेवली. वाजपेयींनी ती मान्य केली. बाळासाहेब पुन्हा बरसले आणि 'ऑटोनॉमीची मागणी करणार्‍या फारुख अब्दुल्लाला राष्ट्रपती बनवु नये'. पुन्हा युपीचे वाजपेयी महाराष्ट्राच्या बाळासाहेंबांसमोर गप्प झाले. खर्‍या महाराष्ट्रप्रेमी माणसाला या गोष्टींचा आनंद होतो. अजुन एक गोष्ट सांगावी वाटते ती म्हणजे पाकिस्तानला भारताने २० दहशदवाद्यांची मागणि केल्यावर ,पाकिस्तानने 'आम्हाला बाळ ठाकरे द्या' अशी मागणि केली होती.काही पाकीस्तानी लोकांनी मला सांगितल होत की 'पाकीस्तानका बच्चा बच्चा बाल ठाकरेको जानता है और उसको गाली देता है'. भारताच्या शत्रु राष्ट्रातील लोक एका अशा माणसाला घाबरतात ज्याच्याकडे एकही पद नाही व तो माणुस माझ्या महाराष्ट्राचा आहे याचा खर्‍या महाराष्ट्रप्रेमीला अभिमान वाटतो.बाळासाहेबांच्या बोलण्याने दिल्ली तर हादरतेच पण पाकिस्तानही हादरते हे यातुन स्पष्ट होते. सरंजामशाहीची उपमा किती मुर्खपणाची आहे हे यातुन स्पष्ट आहे. तुम्ही स्वतःच लिहिता की 'उत्तर भारतावर मुघली साम्राज्याचा पगडा आहे'. मग या मुघली साम्राज्याच्या पगडा असलेल्यांसाठी बाळासाहेबांनी धर्मनिरपेक्ष राजकारण केले असते ना!!!!मुळात बाळासाहेबांनी पुर्वीपासुनच हिंदुत्व आणि मराठी हे दोन्हीही मुद्दे घेतले होते. ज्याची ज्या वेळी जास्त गरज त्याच्यावर त्या वेळी त्यांनी जास्त emphasis दिलेला आहे. तुमच्या म्हणन्याप्रमाणे जर सेनेनी मराठीत्व सोडलेच असते तर मग हिंदुत्वाच्या मुद्द्याशी फारकत घेउन प्रतिभाताईंना फक्त 'मराठी महीला' म्हणुन राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा दिलाच नसता.युती शासनाने परप्रांतीयांचे येणे थांबवण्यासाठी 'पर्मिट सिस्टीम'आणायचा प्रयत्न केला होता हा तपशील तुम्ही कसा काय विसरलात??बाळासाहेबांनी 'पॉप्युलॅरिस्ट पॉलिटीक्स' केलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच शिवसेना आत्तपर्यंत फक्त एकदाच शासन करु शकली आहे.हिंदुत्वाचा मुद्दा असुनही २ वर्षापुर्वी झालेल्या मुंबई बाँबहल्ल्यांनंतर ज्या मुस्लिमांनी रॅलीज काढुन हल्ल्याचा निषेध केला त्या मुस्लिमांना बाळासाहेबांनी सलाम केलेला आहे.मागच्या गणेशोत्सवात लालबागच्या गणपती समोर मुस्लिमांनी फटाके फोडून मिरवणुकिचे स्वागत केले तेंव्हा बाळासाहेबांनी अग्रलेखातुन त्या मुस्लिमांचे अभिनंदन केले होते.काही लोकांना ही बाळासाहेबांची धरसोड वृत्ती वाटते .मला वाटते 'जे मनात ते ओठात' अशी सरळ वृत्ती आहे.

आता जैनांच्या टॉवर्सचा मुद्दा.सेनाप्रमुखांनी जेंव्हा वाढदिवसाला मुंबईतील बिल्डर्सना 'टॉवर्समधील ५०% जागा मराठी माणसाला द्याव्यात' असा दम भरला होता तेंव्हा तुम्ही लोकप्रभा मधे 'शाब्दिक खेळ' करुन याला अप्रत्यक्षपणे विरोध केला होता हे विसरु नये.शिवाय त्याच लेखात तुम्ही बाळासाहेबांना नेहरुंचे उदाहरण देउन सहिष्णुतेचे धडे दिले होते. आता त्याच नेहरुंचे तुम्ही कट्टर विरोधक बनला आहात.बाळासाहेबांना सहिष्णुतेचे धडे देणारे राजु परुळेकर एकदम मनसेच्या भैयांविरुध्दच्या मारामार्‍यांना 'स्वाभिमान्,अस्मिता' म्हणुन बिनशर्त पाठींबा देतात्.अरेच्चा, मग सहिष्णुतेच काय झाल???का राज ठाकरेंना तो नियम लागु होत नाही??कृष्णा देसाई ते श्रीधर खोपकर यांच्या उदाहरणातुन तुम्ही रमेश किणीला खुबीने वगळता.हे double standards का??आता महाराष्ट्र धर्म ,संस्कृती म्हणणारे तुम्ही त्याच लेखात लिहिता की 'मुळात मराठी असो अथवा अन्य कुठली असो ,संस्कृती ही वाढते वा तिचा र्‍हास होतो.चंद्राप्रमाणे तिची अवस्था असते.ती टिकवता येत नाही.' आता राज ठाकरेंनी शिवसेनेचा मुद्दा घेतल्यावर तुम्ही त्यांना का सांगत नाही की 'संस्कृती चंद्राप्रमाणे असते ,टिकवता येत नाही.तुम्ही टिकवायचा प्रयत्न करु नका'. पण नाही आता तुमचे म्हणने आहे की मुंबईत मराठी संस्कृती टिकवली जाउ शकते. तीनच महिन्यात इतका वैचारीक फरक???

संजय निरुपम जेंव्हा सेनेत होता तेंव्हा त्यानेही भुमिपुत्रांची भुमिका जोरात मांडली होती.अनेक कार्यक्रमांमधे त्याने 'परप्रांतियांचे मुंबईत येणे रोखले पाहीजे' असे दणकावुन सांगितले होते. ते कार्यक्रम मी स्वतः बघितले आहेत्.आता पार्टी बदलली आणि तोही बदलला.उध्दव ठाकरेंनी छट पुजेला हजेरी लावली तर काही महत्पाप केले असे मला बिल्कुल वाटत नाही. आम्ही परदेशात राहुन गणेशोत्सव्,शिवजयंती साजरी करतो.त्याला परदेशी लोक उपस्थित असतात्.मग परदेशात कोणी म्हटले की 'इथे फक्त याच देशाचे सण साजरे करा' तर ते चुकिचे आहे.तुम्ही म्हणता की 'राज ठाकरे बदलणार नाहीत ना हा प्रश्नच गौण आहे'. याचा काय अर्थ आहे??तेही उद्या बदलणार असतील तर मराठी माणसाने त्यांना का पाठींबा द्यावा???शिवाय त्यांच्या पक्षाचे बदलणे आत्तच सुरु झाले आहे.खालील बातमी वाचा-http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2889253.cmsज्या वेळी भैय्यंना मारल्याच्या जखमाही भरल्या नव्हत्या त्या वेळी मनसे भैय्यांबरोबर उत्तर प्रदेशि स्टाईलमधे होळी खेळत होता.याचा तुम्ही का विरोध केला नाही??पण उध्दवने भैय्यंच्या सणाला उपस्थिती लावली तर ते चुकिचे पण राजची मनसे भैय्या स्टाईलमधे धुमधडाक्यात होळी साजरी करते ते चालते??भैया चालत नाहीत ना मग मनसेतले चौबे का कोण ते,रीटा गुप्ता,हिंदी साहित्यिक वागीश सारस्वत तुम्हाला कसे चालतात???इंडीअन एक्प्रेसला अशीही बातमी होती की मारामार्‍यांनंतर मनसेतील भैय्यांचे सदस्यत्व वाढले आहे.माझा विरोध भैय्यांबरोबर होळी साजरी करण्याला नाही पण त्याचप्रमाणे सेनेच्या नेत्यांच्या युपी सणांच्या उपस्थितीलाही नाही.

आता मराठीचा मुद्दा-भैय्या इथे येउन मराठी शिकत नाहीत ,मराठी संस्कृतीशी एकरुप होत नाहीत असा आक्षेप घेतला जातो.माझा प्रश्न असा आहे की मुस्लिमांचे काय्???ते तर इथे पिढ्यानपिढ्या रहात आहेत पण त्यांना मराठी बोलता येत नाही.८०-९०% महाराष्ट्रीय मुस्लिम उर्दुच बोलतात. मराठी संस्कृतीशी त्यांना काहीही देणघेण नाही.त्यांना फक्त इस्लामी संस्कृती महत्वाची वाटते.त्यांच्या विरुध्द तुम्ही कधीच काहीच का लिहित नाही??ज्या बाबासाहेब आंबेडकरांचे मुद्दे तुम्ही भरभरुन दिले आहेत तेच बाबासाहेब मुस्लिमांबद्दल बघा काय म्हणतात(मुळ मराठी शब्द सध्या उपलब्ध नाहीत्,अनुवादात अर्थबदल केला असा माझ्यावर आरोप होउ नये म्हणुन उपलब्ध असलेला मुळ हिंदी अनुवाद देत आहे) "मुसलमानों के लिए है कुरान गैर मुसलमान को मित्र बनाने का विरोधी है इसलिए हिन्दू सिर्फ घृणा और शत्रुता के योग्य ही हैं मुसलमानों की निष्ठा भी केवल मुस्लिम रास्त्रो के प्रति होती है इसलाम सच्चे मुसलमान हेतु भारत को अपनी मातृभूमि और हिन्दुओ को अपना निकट सम्बन्धी मानने की आज्ञा नहीं देता, संभवतः यही कारण था की मौलाना मोहमद अली जैसे भारतीय मुसलमानों ने भी अपने शरीर को हिंदुस्तान की अपेक्षा येरुशेलम में दफनाना अधिक पसंद किया कांग्रेस में मुसलमानों की स्थितियो के सम्पर्दायिक चौकी की तरह है गुंडागर्दी मुस्लिम राजनीती का स्थापित तरीका हो गया है इस्लामी कानून समाज सुधर के विरोधी हैं वे धर्मनिरपेक्षता को नहीं मानते हैं मुस्लिम कानूनों के अनुसार भारत हिन्दुओ और मुसलमानों की समान मातृभूमि नहीं हो सकती वे भारत जैसे गैर मुस्लिम देश को इस्लामिक देश बनाने में जिहाद 'आतंकवाद' का संकोच नहीं करते."आता या मुस्लिमांविरुध्द बाळासाहेबांनी आघाडी उघडली तर काय चुकल???बर तेही सोडा. मुंबईत जवळपास ५-७लाख बांग्लादेशी आहेत. त्यांना इथल्या भाषेशी ,संस्कृतीशी काहीही देणघेण नाही,ते भारताच्या (फक्त मराठी ओळख असणार्‍यांनी हा शब्द 'मराठी लोकांना' वाचावा) आंतरिक सुरक्षेला सर्वात मोठा धोका आहेत.हे मी म्हणत नाही तर सुपरकॉप के.पी.एस.गिल म्हणतात. त्यांना हाकलण्यासाठी तुम्ही कधीच का लिहित नाही???त्यांना हाकलल्यास गुन्हेगारी कमी होईल्,गर्दी कमी होईल.मराठी माणसाची भविष्यात होणारी हानी वाचेल.भारतात सध्या शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा मोठा प्रश्न आहे.महाराष्ट्र यात आघाडीवर आहे. विदर्भातील शेतकरीही मराठीच आहेत्.उध्दव ठाकरे या शेतकर्‍यांची एकजुट करवुन आणत आहेत्,त्यांच्यासाठी आंदोलन करत आहेत्.पण या आंदोलनांना पाठींबा देण्याऐवजी तुम्ही तुमच्या स्तंभातुन याची 'आंदोलनांचा खेळ' म्हणुन खिल्ली उडवली आहे!!!विदर्भातील शेतकरी मराठी नाहीत का???का फक्त मुंबई-ठाण्यात मराठी माणुस रहतो???जिथे खराखुरा 'मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न' आहे तिथे तुम्ही गप्प बसता.आज विदर्भात होणार्‍या आत्महत्यांकडे महाराष्ट्र सरकारने दुर्लक्ष केलेले आहे.उध्दव ठाकरे सोडले तर कोणीही मराठी नेता त्यात 'इंटरेस्ट' घेत नाही. उद्या या वागणुकीला कंटाळुन वेगळ्या विदर्भाच्या मागणीने जोर धरला व संयुक्त महाराष्ट्र फुटला तर्???मग तुम्ही परत मोठेमोठे अभ्यासपुर्ण लेख लिहाल्.पण सध्या उध्दव ठाकरेंना पाठींबा देणार नाही.

तुम्ही तुमच्या लेखात आंबेडकर्,अत्रे यांचे वारसदार दिवाळखोर निघाले म्हटले आहे.आंबेडकरांचे राहु द्या पण अत्र्यांचे वारसदार म्हणजे आजचे पत्रकार('मर्‍हाटा'काढल्यामुळे अत्र्यांनाही पत्रकार म्हणायला हरकत नसावी) तर नंबर एकचे दिवाळखोर आहेत.एव्हढेच नव्हे तर 'पत्रकार धर्म' विसरुन राजकीय कंपुबाजीत सगळे धन्यता मानत आहेत. राजु परुळेकरही त्यातलेच.'१९९० पासुन बाळासाहेबांनी महाराष्ट्र धर्माला नख लावायला सुरुवात केली' म्हणतात्.मग तुम्ही १८ वर्ष मुग गिळून का बसला होता???राज ठाकर्‍यांनी सेना सोडण्यापुर्वी(सोडल्यानंतरही) तुम्ही अनेकदा सेनाप्रमुखांवर स्तुतीसुमने उधळली होती.तेंव्हा कुठे गेला होता तुमचा 'महाराष्ट्र धर्म'??अत्र्यांनी त्यांच्या वृत्तपत्रातुन सतत मराठीचा मुद्दा धगधगत ठेवला.पण राजु परुळेकर मायावाती,मोदी व इतर अनेकविध विषयांवर आपली मते मांडत होते. अरे मराठीची इतकी वाईट परिस्थिती असताना तुम्हाला ती पुढे आणण्यासाठी आंदोलनाची गरजच का पडते??आंदोलन नव्हते तेंव्हा तुम्ही का लोकांना या विषयावर जागरुक केले नाही???तुमच्याकडे बंदुकिपेक्षाही घातक लेखणी नावाचे अस्त्र होते ते तुम्ही म्यानात ठेवुन 'चिल्लर' गोष्टींवर स्वतःचा स्तंभ भरवत होता.कधी राजकारण तर कधी काय. सगळ नॉन सेंस.मायमराठी भरडली जात असताना तुम्ही स्वतः त्याबद्दल लिहुन जनजागृती केली असती त्याला काही अर्थ होता.उगाच घडणार्‍या घटनांवर विश्लेशण करणे आणि याला त्याला दोष देणे फार सोपे असते.त्यात कंपुबाजी करुन 'पॉप्युलॅरीस्ट पत्रकारीता' करण तर अजुनच सोपं.सच्च्या पत्रकाराने शिवसेना मराठीचा मुद्दा सोडायला लागली असे वाटल्यावरच टिका केली असती. २ वर्षांपुर्वी राज ठाकर्‍यांनी सर्वसमावेशक धोरण घेतल त्याही वेळी 'भैय्यांना हटवायची गरज असताना सर्वसमावेशक धोरण कसल घेता??' म्हणुन राजवर हल्ला केला असता. पण तुम्ही यातल काहीच केल नाही.बहुतेक मनसेबरोबर जाउन चांगली संधी मिळेल असे तर तुमचे धोरण नाही ना??कारण पुण्यात समीरण वाळवेकरांनी घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी स्वतःच वृत्तपत्र सुरु करायचय असा मनोदय बोलुन दाखवला होता.मग त्याच्या संपादक पदी आपलीही वर्णी लागावी म्हणुन तुम्ही मनसेला पाठींबा करत नाही ना??मला भैय्यांबद्दल काडीचही प्रेम नाही.राज ठाकर्‍यांच्या भाषणाचा मीही फॅन आहे.त्यांच्या आंदोलनालाही माझा विरोध नाही.माझा विरोध स्वार्थी पत्रकारांना आहे.तुम्ही आधी शिवसेनेच्या कंपुत होता आता मनसेच्या कंपुत आहात. उद्या एखादा अजुन चांगला पर्याय आला तर तिकडेही जाल.अशी राजकीय कंपुगिरी करणार्‍या पत्रकारांनी सेनेला 'दिल्लीचे मनसबदार' तर शरद पवारांना 'वॉरलॉर्ड' म्हणन्याची गरज नाही.

आपला
चिन्मय कुलकर्णी

ता.क.-ज्या वेळी स्वातंत्र्याशी गरज होती आणि हिंदुविरुध्द 'डायरेक्ट ऍक्शन्स' होत होत्या त्या वेळी तमिळ लोकांनी द्रविडनाडुची मागणि केली होती.फाळणीवादी असलेल्या इतिहासातील तमिळ नेत्यांचीच करुणानिधी व समस्त कट्टर तमीळी पक्ष पिलावळ आहे.करुणानिधीने LTTE चा दोन नंबरचा म्होरक्या मारला गेल्यावर त्याच्यावर १ वर्षापुर्वी स्तुती करणारी कविता लिहुन ती प्रकाशित केली होती.महाराष्ट्राने या देशद्रोह्यांच्या पावलावर पाऊल का ठेवाव??

10 comments:

Anonymous said...

छान चिन्मय... एक एक शब्द महत्त्वाचा आहे आणि त्यांची सांगड जबरदस्त आहे.

सगळीकडे राजकारण सुरू आहे... मनसेनी भैयांविरोधात केलेले राजकारणच आणि परवा शिवतिर्थावर मांडलेले बाबासाहेबांचे मुद्दे हेही राजकारण त्यामागे फक्त मराठी मतांचा वास येतो. बाबासाहेबांचे मांडलेले मुद्दे काही मराठी मतांसाठी नव्हते पण काय करणार मराठी अस्मिताएवढी स्वस्त झाली आहे कि कोणीही एखाद्या परप्रांतियावर दगड मारले कि तिथे मराठी अस्मितेचा प्रश्न निर्माण झाले म्हणून समजा. वरून पुन्हा राजू परूळेकर सारखे पोसलेले पत्रकार आहेतच कि यांची तळी उचलायला. "गर्जतो मराठी" जेव्हा शिवसेना करते तेव्हा म्हणतात आता मराठीमाणसाची आठवण झाली. "शिववडा" सुरू करते तेव्हाही टिकाच हि लिंक पहा - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3037621.cms 'बॉम्बे' चे मुंबई करण्यासाठी आंदोलन होते तेव्हाही अज्ञानी म्हणून संबोधले जाते पुन्हा लिंक पहा - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3037625.cms

खरे तर ह्या पत्रकारांमुळे आपले जेवढे पर्यायाने देशाचे खुप मोठे नुकसान झालेय.

अनामिका!! said...

चिन्मय !
योग्य शब्दात तुम्ही मांडणी केली आहे सगळ्या मुद्द्यांची.
हल्ली शिवसेनाद्वेषाची काविळ सरसकट सगळ्यांनाच झाली आहे असे एकंदरीत लक्षात येते.
राजु परुळेकर यांचे लिखाण मला कायम आवडत आले.पण अचानक त्यांनी अश्या प्रकारे कोलांटिउडी मारण्याचे प्रयोजन काय ?हे कळत नाही.
सेनाप्रमुखांवर ताशेरे ओढणार्‍यांच्या पंक्तित त्यांनी स्वतला सामिल करुन घेतल्याचे बघुन खरच वाईट वाटले.
राज ठाकरे यांनी मराठीच्या संदर्भात जे आंदोलन सध्या छेडले आहे त्याचे समर्थन करण्याच्या नादात सेनेवर आगपाखड करण्याचे काय कारण हे समजत नाही?आपल्या निष्ठांचे प्रदर्शन मांडण्याचा तर हा प्रयत्न नसावा?पण तशी गरज राजु परुळेकरांसारख्या प्रथितयश लेखकास व विचारवंतास का पडावी?आपण जो "राजकीय कंपुबा़जी "हा शब्दप्रयोग वापरलात तो अतिशय यथार्थ आहे.
सेनाप्रमुखांनी हिंदुत्वाचा पुरस्कार करताना "हिंदुत्व हेच राष्टियत्व" हा नारा दिला.परुळेकरांनी त्या हिंदुत्वावर देखिल आक्षेप घेतला आहे याचा अर्थ पर्यायाने परुळेकरांना सावरकरांचे हिंदुत्व देखिल मान्य नाही असाच होतो.
महाराष्ट्राचे दुर्दैव असे की सध्याच्या वृत्तपत्रांमधे व प्रसारमाध्यमांमधे मराठी आणि महाराष्ट्राचे हित यासंदर्भात आवाज उठवणारे कुणी नाही. आणि जे एक सामना हे वृत्तपत्र आहे त्याला देखिल सेनेचे मुखपत्र म्हणून हिणवले जाते.
या क्षणी मी बाळासाहेबांनी सामना मधे लिहिलेल्या विवादित व प्रसिद्ध लेखांचे संकलन असलेले व संजय राऊत यांच्या द्वारे संकलित केलेले "ठाकरी "हे पुस्तक वाचत आहे.मुंबई बाँबस्फोटांनंतर बाळासाहेबांनी लिहिलेले लेख वाचुन ते किती अंतकरणापासुन लिहिले असावेत याची प्रचिती येते. मुंबईत झालेल्या दंगलींमधे हिंदु केवळ आणि केवळ सेनेमुळे आणि बाळासाहेबांमुळेच वाचले हे सत्य कुणि कितिहि नाकारले तरी बदलु शकत नाहि.मी स्वत १९८५च्या भिवंडि दंगलीचा अनुभव घेतला आहे. या अखंड भारतात जर कुणी मर्द नेता असेल तर तो फक्त आणि फक्त बाळासाहेबच आहेत .
राजु परुळेकरांनी आजपर्यत सेनेची कास धरली होती आता बहुदा ते मनसेचे समर्थक आहेत्.पण आजपर्यंत राजने देखिल सेनेच्या धोरणांवर टिका केली असेल पण बाळासाहेबांबद्दल अनुद्गार काढले नाहीत्.राज व बाळासाहेब यांचे नाते अगम्य आहे.त्यात कुठल्याही प्रकारे विष कालवण्याचा प्रयत्न स्वतला पत्रकार म्हणवणार्‍यांनी करु नये इतकीच नम्र विंनती. पुन्हा या सेना मनसे यांचे मनोमिलन व्हावे ही तमाम मराठी बांधवांची प्रामाणिक इच्छा आहे.
जय हिंद !
जय महाराष्ट्र!

Anonymous said...

kharokharach vachaniy aahe


sandeep

Unknown said...

sahich chinmay

koustubh kulkarni said...

सुंदर लॆख !! पु.लं. प्रमाणे मला ही म्हणावसं वटतय "मल सगळ्याच पुढा-यांची मतं पटतात हो !!". :). परुळेकर हे तसे "सेना" गटातलॆ. मनसे ला उचलून धरताना सेनेवर टीका करण्याची गरज नव्हती. हे वाचून आनंद झाला, कळल की मराठी माणूस जगृत अहे. तो पक्षपाती नाही, आणि सापेक्ष विचार करणारा आहे.
जय हिंद, जय महराष्ट्र !!

Anonymous said...

i need some time to digest ur article. i think u can give better direction to this community.
all the best!

छोटा डॉन said...

Mast re chinmay, agadi chhan muddesud lihale aahes ...
Mi pan changale observe kele aahe "RAJU PARULEKARANCHE" vagane, purvi shivasenet asataanaa te "BALASAHEB" mhanaje marathi svabhimaanaacha manbindu manayache aani aaj achanak te "MAHARASHTR DHARMACHE SHATRU" kase tharataat ???
Mala tar to lekh baraach ekangi vatalaa hotaa ...

Aso. Tuze abhinandan agadi vyavasthit muddaa mandalyaabaddal ...

Anonymous said...

तुझा नेमका विरोध कोणाला आहे?
राज ठाकरे कि राजु परुळेकर?आज दोघेही मराठीसाठी लढत आहेत. म्हणुन दोघानी एकत्र यायला नको का?बर त्यात जर राज साहेब एकादे वृत्तपत्र सुरु करणार असले तर त्याची भुमिकेशी आणि विचाराशी साधर्म्य असणारय व्यक्तीचीच ते निवड संपादक म्हणुन करणार का निखिल वागळेची करतील? तुला नेमके काय वाइट वाटते ते तु सविस्तर लिही.

abhay

Chanakya said...

sundar lekh.. keep writing

abhishek said...

फारच छान लेख. अप्रतिम. तुम्ही तुमचे मत परुळेकरांना E-Mail करावे असे मला वाटते.
rajuparulekar@hotmail.com