Follow me on Twitter- https://twitter.com/doc_chinmay

Saturday, May 31, 2008

शौर्य

काही दिवसांपुर्वी 'शौर्य' हा चित्रपट पाहीला. राहुल बोस्,केके मेनन हे यातील अभिनेते. चित्रपट तसा ठिक आहे. 'अ फेव गुड मेन' नावाच्या इंग्रजी चित्रपटावरुन उचलेगिरी केलेली आहे पण त्याला हिंदु-मुस्लिम्(नेहमीप्रमाणे)रंग दिलेला आहे.चित्रपटाच्या समीक्षेपेक्षा त्यात दाखवलेल्या घटनांबद्दल लिहीत आहे. त्यामुळे चित्रपटाची थोडक्यात कथा लिहितो. जावेद खान नावाच्या लष्करातील अधिकार्‍यावर आपल्या वरिष्ठ अधिकार्‍याच्या हत्येचा आरोप असतो.राहुल बोस जावेद खानचा वकील असतो.जावेद खानने आपला वरीष्ठ अधिकारी राठोडची हत्या केलेली असते.राहुल बोसने पत्रकाराला दिलेल्या चुकीच्या मुलाखतीमुळे ब्रिगेडिअर प्रताप (केके मेनन) यात ओढला जातो.नंतर शोध घेता घेता राहुल बोसच्या लक्षात येते की राठोड हा माणुस फार क्रुर होता व त्याला ब्रि.प्रताप पाठीशी घालत असे.शेवटी ब्रि.प्रतापला न्यायालयात बोलावण्यात येते.राहुल बोस त्याला उकसवतो व त्याच्या मृत कुटुंबाबद्दल सांगतो. त्याच्या संपुर्ण कुटूंबाची त्याच्याच मुस्लिम नोकराने निर्घुण हत्या केलेली असते. ब्रि.प्रतापच्या ८ वर्षाच्या मुलीवर बलात्कारही केलेला असतो. हे सर्व राहुल बोस कोर्टात सांगुन ब्रि.प्रतापला त्या नोकराबद्दल ऍन्युअल कॉन्फिडेंशिअल रीपोर्टमधे न लिहिण्यामागचे कारण कसले भय तर नाही ना असे विचारतो. स्वतःला शौर्यवान समजणारा ब्रि.प्रताप तोंड उघडतो. सर्व मुस्लिमांना मारुन टाकायला हवे वगैरे सांगतो हे सर्व बोलल्यानंतर ब्रि.प्रतापवरच कोर्टमार्शल होते व जावेद खानला सोडुन देण्यात येते.
केके मेननने जबरदस्त अभिनय केलेला आहे त्याचप्रमाणे राहुल बोसनेही चांगली भुमिका केली आहे.
नेहमीप्रमाणे या चित्रपटात हिंदु कसे कृर आणि मुस्लिम कसे शांतीप्रिय देशभक्त असे दाखवण्यात आले आहे.काश्मिरमधे दहशतवाद आहे पण या दहशतवादाला भारतील लष्करच जबाबदार आहे असेही अप्रत्यक्षपणे दाखवले आहे. म्हणजे लष्करातील मुस्लिमविरोधी अधिकारी निष्पाप मुस्लिमांना मारुन टाकतात व त्यांच्यावर दहशतवादी असल्याचा आरोप ठेवतात.बंदुक डोक्यावर ठेवुन 'माझ्याकडे एके ४७ आहे' हे वदवुन घेउन त्यांना मारुन टाकतात. याला रोखणे शक्यच नाही कारण वरीष्ठ लष्करी अधिकार्‍यांचा अशा कृत्यांना आशिर्वाद असतो.पण हे करताना शेवटी वेगवेगळ्या वर्तमानपत्रातील बातम्यांच्या हेडलाईन्स दाखवल्या आहेत. ज्यापैकी बर्‍याच आसाम,मणिपुर मधील आहेत. म्हणजे दिग्दर्शकाला दाखवायचे आहे की त्याचे म्हणने कसे बरोबर आहे. पण या आसाम्,मणिपुर मधील बर्‍याचशा घटना हिंदुंवर झाल्या होत्या हे दिग्दर्शक विसरतो.
माझ्यामते हा चित्रपट बनवताना लष्करातील सैनिकांची,अधिकार्‍यांची मनस्थितीच विचारात घेतलेली नाहीये.लष्करात काम करताना लष्करी अधिकार्‍यांवर किती दबाव असतो याकडे पुर्णपणे दुर्लक्षच केले आहे. माझे काही मित्र,नातेवाईक लष्करात होते , आहेत यांनी असे सांगितले आहे की काश्मिरात काम करताना अधिकार्‍यांवर प्रचंड दबाव असतो. कधी कुठे बॉम्बस्फोट होईल सांगता येत नाही. तो झाल्यानंतर दहशतवादी पळुन जातात त्यांचा शोध घेणेही खुप अवघड असते.शिवाय या दहशतवाद्यांना बर्‍याचदा जनतेचा पाठींबा असतो. ते दहशतवाद्यांना लपायला मदत करतात. कधीकधी लष्कराचे खबरी चुकीची माहीती देतात्.त्यामुळे दिशाभुल होते. अशा अनेक कारणांमुळे लष्कराकडुन कधीकधी चुका होतात. ज्या होणे स्वाभाविकही आहे.पण चुकांवर लष्करात कारवाईही होते.
या चित्रपटात असे दाखवले आहे की राठोड नामक अधिकारी निष्पाप लोकांच्या हत्यांवर हत्या करत असतो व मेडल्स मिळवत असतो.एका ठिकाणी एका निष्पाप मुस्लिम तरुणाची तो हत्या करतो व एका लहान मुलीवरही तो गोळी झाडणार असतो. जावेद खान त्याला म्हणतो की तू जे करतो आहेस ते चुकिचे आहे.पण राठोड अजुन लोकांची हत्या करण्याआधीच जावेद खान त्याची हत्या करतो.जावेद खानची नंतर यातुन सुटका होते. शेवटी राठोड चुक होता हे मान्य पण जावेद खानने त्याच्या वरीष्ठ अधिकार्‍यावर गोळी घालुन एका प्रकारे कायदा मोडलाच होता ना???मग त्याला का सोडण्यात येते???लष्करात एक शिस्त असते. आदेशाचे कारण न विचारता पालन करणे हा तिथे नियम असतो. जर लष्करातील सर्वच सैनिक स्वतःच काय बरोबर काय चुकीचे ठरवु लागले तर लष्करात अराजक माजेल. सुरक्षा करणे शक्यच होणार नाही.समजा उद्या भारतीय सरकारने व लष्कराच्या अतिवरीष्ठ अधिकार्‍यांनी एखाद्या देशाबरोबर युध्द करण्याचा चुकीचा निर्णय घेतला. जर लष्करातील सैनिक म्हणु लागले 'हा निर्णयच चुकीचा आहे.यामुळे निष्पाप लोकांची फाल्तु जिवितहानी होईल्.त्यामुळे आम्ही या युध्दात भाग घेणार नाही', तर काय होईल??सैन्यातील लोक जर स्वतःच ठरवु लागले की काय चुक आहे,काय बरोबर आहे आणि स्वतःच इतरांवर गोळ्या झाडुन हत्या करू लागले आणि नंतर न्यायालयात स्वतःची बाजु बरोबर आहे हे पटवल्यावर सुटू लागले तर सैन्यात आपापसातच युध्द होईल.या चित्रपटात जावेद खानचे जरी बरोबर होते तरी त्याने लष्करी कायदा व शिस्त मोडली म्हणुन त्याला काहीतरी शिक्षा व्हायलाच हवी होती.
केके मेननचा अभिनय चित्रपटात सुंदर आहे पण अनेक चुकीच्या गोष्टी चित्रपटात दाखवलेल्या आहेत व त्या चुकीच्या गोष्टी अनेक लोकांना बरोबर वाटत आहेत त्यामुळे हे सर्व लिहिले.

3 comments:

GS said...

At least somebody is having the courage to expose these kind of movies.

Thanks a lot!!

Turrtle said...

Rahul Bose as an army officer is a joke. The man cannot act for nuts. Will go through your review at length.

Anonymous said...

few good men madhye aaropincha nidoshittva siddha hote pan tyannaa navy madhun kadhale jaate

he shoury madhye nahi.

karan shoury secular bhartat release zala jithe; hindu hyacha dusara arth doshi ani musalman cha dusara arth nirdoshi

baaki kk mennoncha abhinay apratim