रशिया आणि जॉर्जियातील युध्द आज थांबले आहे.पण जसे हे युध्द सुरु झाले तसेच या युध्दातील विरोधाभास स्पष्टपणे दिसुन येउ लागला.मुळात रशियातील जे परदेशी नागरीक व इंग्रजी भाषा समजारे व आंतरराष्ट्र्यि मिडियाचे दर्शक असणारे रशियन नागरीक यांना तर या युध्दाने एकदमच confuse करुन टाकले.त्यामुळे युध्द सुरु करण्यात हात नक्की कुणाचा होता हे अजुनही येथे स्पष्ट झालेले नाही. आंतरराष्ट्रिय मिडीया म्हणजे सीएनएन्,बीबीसी पुर्णपणे जॉर्जियाच्या बाजुने बातम्या देत होता व रशियन मिडीया त्याच्या बरोबर विरुध्द बातम्या देत होता.
एक गोष्ट मात्र नक्की की जॉर्जियाचे राष्ट्रपती मिहाईल(मायकल) साकश्विली यांनी आंतराष्ट्रिय मिडियाचा अतिशय चांगल्या पध्दतीने वापर करुन घेतला.मुख्य म्हणजे त्यांना इंग्रजी येत असल्याने त्यांचा पत्रकारांशी थेट संवाद होत होता व ते सतत मिडीयाच्या बरोबर राहुन आपली वक्तव्ये करत होते. तर त्याच्या बरोबर विरुध्द रशियन मिडीया जॉर्जियाची कशी चुक आहे व जॉर्जियन राष्ट्रपती कसे खोटे बोलत आहेत हे दाखवत होते.एका बातमीमध्ये साकश्वीली रस्त्यावर बुलेट प्रुफ जॅकेट घालुन आलेले सीएनएन,बीबीसीने दाखवले होते त्याच्या रशियन मिडीयानी चांगलाच समाचार घेतला.बातमीच्या आधीच्या फुटेजमधे साकश्विली मनसोक्त हसताना रशियन मिडीया ने दाखवले व सांगितले की 'यांचा देश अतिशय मोठ्या संकटात आहे हे साकश्विली सांगतात आणि इथे तर मनसोक्त हसत आहेत्'.मग थोड्या वेळानी साकश्विली यांनी पत्रकारांना सांगितले की रशिया कसा हल्लेखोर आहे ,त्यानंतर मग आकाशातुन कसलातरी आवाज आला आणि एकदम साकश्विली आणि त्यांचे अंगरक्षक पळापळ करु लागले आणि नंतर साकश्विली खाली बसले व त्यांना वरुन व इतर सर्व बाजुंनी अंगरक्षकांनी गराडा घातला.यावेळी आंतरराष्ट्रिय मिडीयानी सांगितले की आकाशातुन जॉर्जियावर हल्ला होण्याची शक्यता आहे वगैरे.याचा समाचार घेताना रशियन मिडीयानी दाखवले की हा सर्व साकश्विली यांनी केलेला स्टंट होता कारण अस इतक लगेच घाबरुन जाण्यासारख काहीच झाल नव्हत. नंतर परत अशीही पुस्ती जोडली की साकोश्वीली सगळ्या जॉर्जियन्सना सांगत आहेत की 'घाबरु नका' आणि साकोश्विली स्वतःच घाबरले आहेत.
एकीकडे जॉर्जियन राष्ट्रपती रशिया वर सगळा दोष टाकत होते आणि असेही सांगत होते की रशियाने बीबीसीच्या पत्रकारांवर हल्ला केला त्याचवेळी रशियन मिडीया जॉर्जियावर दक्षिण आसेतियन लोकांवर जॉर्जिया करत असलेल्या 'जिनोसाईड्'चा इतिहास देत होता.जॉर्जियन राष्ट्रपती असेही म्हणत होते की 'जॉर्जिया हा जगातल्या सर्वात चांगल्या लोकशाही देशांपैकी एक देश आहे' तर रशियन वरीष्ठ पत्रकार सांगत होते की जॉर्जिया जगातला सर्वात मोठा शस्त्र खरेदी करणारा देश आहे.जॉर्जियाने विविध देशांकडुन खरेदी केलेल्या शस्त्रांची यादीही रशियन मिडीया दाखवत होता. जॉर्जियाने गेल्या ५ वर्षात आपले डीफेन्स बजेट ३० पटीने का वाढवले आहे,इतक्या लहान देशाला १ अब्ज डॉलर्स इतक डिफेन्स बजेट कशाला लागत्,तसेच जॉर्जिया जगातला सर्वात चांगला लोकशाही देश नाही तर सर्वात जास्त युध्दसामग्री खरेदी करणारा देश आहे हे सांगत होते.
यामध्ये अमेरिकेच्या भुमिकेचाही उहापोह झाला. साकश्विली अमेरिकेने यात हस्तक्षेप करावा व लष्करी मदत करावी अशी भुमिका घेत होते.त्याचबरोबर जॉर्ज बुश यांनीही रशियावर सहकार्य करत नसल्याचा आरोप केला.रशियाने मात्र फक्त 'अमेरिका या सर्वाच्या मागे आहे' एव्हढ म्हणनच बाकी ठेवल होत.रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतीन यांनी अमेरीकन डिप्लोमॅट्स व 'एक माणुस'(वाचा-जॉर्ज बुश) यामागे आहेत असे जवळपास स्पष्ट बोलत होते तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष दिमित्रिय मिदवेदोव म्हणत होते की आमचे पश्चिमेकडिल 'पार्टनर्स' आम्हाला समजुन घेत नाहीत व त्यांनी साकोश्विलींच्या बोलण्यावर फारस लक्ष देउ नये.रशियाच्या युएन मधल्या ब्युरोक्रॅटनी मात्र सडेतोड उत्तर दिली.अमेरिकेचे १२३ वरीष्ठ अधिकारी जॉर्जियात काय करत आहेत्,अमेरिका जॉर्जियन सैन्याला इराकमधुन स्वतःच्या दळणवळणाच्या साधनांतुन जॉर्जियात वापस का आणत आहेत असे सडेतोड प्रश्न विचारत होता.त्याचबरोबर रशियन मिडीया अशीही बातमी देत होते की अमेरीकेनी जॉर्जियन सैनिकांना खास प्रशिक्षण दिले आहे त्याचबरोबर एक कृष्णवर्णीय अमेरिकनही यात मरण पावला आहे.तो अमेरीकेचा सैनिक असावा असे त्यांचे म्हणने होते.
हा मुळ वाद तसा जुनाच आहे.पंधरा वर्षांपुर्वी फाळणीवादी आसेतियन्सनी मोठा उठाव केला होता.रशियाचे म्हणने आहे की त्यावेळी जॉर्जियाने हजारो आसेतियन्सचे 'जिनोसाईड' केले.त्यानंतर रशियन शांतीदुत दक्षिण आसेतियात गेले.त्यानंतर रशिया म्हणत होता की उत्तर आसेतियन्सप्रमाणे दक्षिण आसेतियन्सनाही रशियात यायचे आहे.त्यांनी जवळपास २०००० आसेतियन्सना रशियन पासपोर्ट दिले.म्हणजे थोडक्यात हे लोक रशियाचे नागरीक झाले.आधी फाळणीवाद्यांनी हल्ले करायला सुरुवात केली असे जॉर्जिया म्हणते आहे.मग जॉर्जियाने त्श्किनवाली वर हल्ला केला ज्यात रशियाचे काही शांतीदुत व रशियाचे नागरीक्(आसेतियन ज्यांना रशियाने पासपोर्ट दिले) मारले गेल्याने रशियाने प्रतिहल्ला केला.जॉर्जियाचे राष्ट्रपती म्हणत आहेत की रशियाने प्रथम हल्ला केला आणि त्यांचा उद्देश जॉर्जियावर हल्ला करुन सत्ता उलथवण्याचा आहे.साकश्विली रशियन सरकारला मुख्यकरुन व्लादिमीर पुतीन यांना अजिबात आवडत नाहीत कारण साकश्विलींनी पुतीन यांना 'लिलिपुतीयन' म्हणुन हिणवले होते.पुतीन असेही म्हणुन गेले की साकश्विली बरोबर बोलणी होउ शकत नाहीत्.
आज फ्रान्सचे राष्ट्रपती निकोलस सार्कॉझी मॉस्कोत आले व त्यांनी मिदवेदव यांच्याशी चर्चा केल्यावर रशियने शस्त्रसंधी केली.पण अमेरीका व युरोपियन देशांचा या युध्दामागे हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण नॅटो मधे गेलेल्या रशियन एन्व्हॉयनी मे२००८ मध्येच जॉर्जिया युध्दाच्या तयारीत आहे असे वक्तव्य केले होते.मात्र रशियात रहाणार्या लोकांना नक्की कुणावर विश्वास ठेवावा हे कळत नाही आहे कारण आंतरराष्ट्रिय मिडीया व रशियन मिडीया एकदम परस्परविरोधी विधाने करत आहेत.

शनिवार १६ ऑगस्ट २००८
बाकी काल रशियन मिडीयाला चांगलच कोलित सापडल. फॉक्स न्युज वर एका पत्रकाराने दोन दक्षिण आसेतियन स्त्रीयांना बोलावले व त्यांना विचारले की तुम्हाला काय सांगायचे आहे. त्यांनी सांगायला सुरुवात केली 'जॉर्जियन रणगाड्यांनी आमच्यावर हल्ला करायला सुरुवात केली .त्यात रशियन सैन्याचा हात नव्हता.आम्ही रशियन सैन्याचे आभार मानतो की त्यांनी आमच्याविरुध्द होणारे जिनोसाईड थांबवले.' असा एकदमच अनपेक्षित सुर आल्याने मुलाखतकार घाबरलाच. त्यानी लगेच ब्रेक घेतला.मग ब्रेकनंतर त्यानी सांगितल की 'काही तांत्रिक कारणांमुळे आम्ही हा कार्यक्रम पुढे चालु ठेवु शकत नाही.'त्यानी दुसर्या महीलेला म्हटले की तुम्ही ३० सेकंदात तुमचे मत नोंदवा. ती म्हणाली 'मला माहीती आहे की तुम्हाला हे ऐकायच नाहीये पण माझ्या घरावर आधी जॉर्जियन रणगाड्यांनी हल्ला केला.माझा मुलगा त्यात मरण पावला.जॉर्जियन सैन्याने आधी केलेल्या हल्ल्याने २००० आसेतियन्स मरण पावले आहेत्.याला साकश्विली व जॉर्जियन सरकार जबाबदार आहे'. लगेच मुलाखतकाराने कार्यक्रम थांबवला.हे जरी त्यांनी टि.व्ही.वर दाखवल नाही तरी हा व्हिडीओ इंटरनेटवर लीक झाला.त्यामुळे काल दिवसभर रशियन न्युज चॅनेल्स दाखवत होते की कशा प्रकारे अमेरीकन मिडीयाचा अमेरीकेला पाठींबा आहे वगैरे.
6 comments:
sahi re chinmayda ekdam mahiti ti dilis ..
hi baatami ekhdya vruttpatr kade ka nahi det.?? karan currunt sub var evdi mahiti konich deu shakal nasati..tyamule tu hi baatami ekhadya vruttapatr valyakade deu shaklas tar bag..
ह्या सरळ सरळ भांडवलशाही विरुद्ध कम्यूनिसम लाथाळ्या आहेत!!!
आपण बाबा "नाम" धारी!!!
बांडुंग परिषद झाल्यावर.. आपण गप बसणे सोडून केलेच काय?
रशिया मला सवाई मूर्ख वाटतो!!!
च्यायला एवढे स्वतःचा अनुभव आहे की...
देश फुटतो.... चेचेन्या मधे लष्कर घुसवले तरी काही इलाज निघत नाही म..
तरी जॉर्जिया वर हलला केला!!!!
अरे इलाज असा कुठे निघतो का?
इस्राएल...... घुसवले सैन्य आज काय अमुक पट्टी.. उद्या काय पॅलेस्टीन... काय उपयोग?
तेल अवीव अन् हायफा मधे लोक मारतातच आहेत!!!!....
होय,
रशिया आणि जॉर्जिया या युद्धामध्ये बरीच गुंता गुंत आहे... लवकरच त्या बद्दल मी सुद्धा लिहीन....
एक चांगला विषय आहे हा...
एक मात्र खरं..
रशियाने योग्य तेच केलं..!!! 'जॉर्जिया'ची मस्ती उतरायलाच हवी होती...!!
Priyal
मला रशिया मुर्ख वाटत नाहि.
कारण आंतराष्ट्रिय राजकारणात "गिरा तो भी टांग उपर" हेच तत्व राबवाव लागतं.
जॉर्जिया हा हळु-हळु अमेरीकन कंपूत सामिल होत होता. स्वत:च्या कुशीत रशिया असे राष्ट्र कसे निपजु देईल?
शिवाय जॉर्जिया, युक्रेन थोडक्यात कॉकेशस टापुकडे जे तेल आहे त्यावर अमेरीकेचा डोळा आहे हे सांगायला ज्योतिषाची गरज नाहि. पण रशियाच्या एरीयात जाऊन दादागिरी कशी करणार? मग अमेरीकेने रशियाचीच पध्दत उचलली रशियाने क्युबात जशी शस्त्रे उतरवली होती आणि अमेरीकेवर क्युबा गुरगुरत होते तसेच काहि अमेरीकेने जॉर्जिया बरोबर केले आहे. जॉर्जियाचा बोलविता धनी अमेरीकाच. पण रशिया अश्या धडाक्याने इ मोहिम सुरु करेल्से अमिरीकेला वाटाले नसावे. त्यातुन आता बुशचा कार्यकाळ फार नाहि आणि सत्तांतर होण्याची मोठि चिन्हे आहेत अमेरीकेत एक महासत्ता सत्तांतर-निवडणुका अश्या महत्वाच्या अंतर्गत बाबतीत थोडावेळ गुंतली असताना हे आटोपणे रशियाच्य दृशःतिने महत्वाचे आहे.
मुलत: हा प्रश्न ऑशियस प्रांता बद्दल आहे. १९२९ मध्ये जॉर्जिया USSR मध्ये विलीन झाला होता. १९८०-९० च्या दरम्यान सोव्हिएत संघ फुटला आणि १९९१ मधे तो रशियातुन बाहेर झाला. मात्र उत्तर ऑशिअस हा रशियात तर दक्षीण ऑशिअस जॉर्जियात आला आणि ९९ साली जे सार्वमत घेतले गेले त्यात ९५% लोकांना रशियात जायचे आहे असे निदान निघाले या सार्वमतावर ३३-३४ राष्ट्रांचे प्रतिनीधी समितीवर होते. असे असताना जॉर्जिया हटून बसला यात त्याची चुक किती? आज अमेरीकेच्या पाठिंब्यावर तो उड्या मारतोय त्यात जॉर्जियाची चुक किती? आणि परत रशिया अमेरीकेला टोच्या देतोय यात रशियाची चुक किती? हे काळच ठरवेल.
सौरभ
Russia has done good thing..... I appreciate.
Georgia had attacked the friend country of Russia, and Russia went for help. Friend in need is freind in deed.
Even we should attack Bangladesh, because muslim are doing atrocities on Hindus and giving hiding place for terrorists.
Rajesh
Good article.. good analysis..
Article pan chhan ahe ani tyala alelya comments suddha :-)
Sakal madhala Vachakancha patravyavahar vachalya sarakha vatala. It's just a damn politics and good part is ur blog speaks that. Don't judge just keep writing.
Post a Comment