Follow me on Twitter- https://twitter.com/doc_chinmay

Wednesday, January 7, 2009

गांधीजींची अहिंसा-उपयुक्तता आणि मर्यादा

"There are many causes that I am prepared to die for but no causes that I am prepared to kill for."
महात्मा गांधी
केदार जोशीनी अहींसा म्हणजे काय असा प्रश्न विचारला त्यानंतर गांधीजींची अहिंसा म्हणजे काय याचा मी शोध घेतला.गांधीजी म्हणतात की त्यांना एकच मार्ग माहीत आहे आणि तो म्हणजे अहिंसेचा(passive resistance).गांधीजींनी अहिंसेची प्रेरणा कस्तुरबा गांधींकडुन घेतलेली होती.गांधीजींची एखादी गोष्ट कस्तुरबांना पटत नसली तर त्या गांधीजींनी दिलेल्या त्रासाला सहन करत पण विरोधही करत.यातुन गांधीजींचे मन बदलले आणि बायकोवर हुकुम चालवायची त्यांची विचारसरणि कशी चुक होती हे त्यांना कळुन चुकले.पुढे विविध प्रकारच्या परीस्थितींमधुन गेल्यानंतर गांधीजींनी अहिंसा हाच एकमेव मार्ग आहे हे पक्के केले.गांधीजींच्या मते अहिंसा हा मनुष्याचा स्थायीभाव आहे.जे देश आणि समाज अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करतात त्यांनी आत्मसन्मान सोडुन बाकी सगळ्याचा त्याग करायला शिकायला हवे.त्यामुळेच अहिंसा हे कुठल्या भित्र्या माणसाचे नाही तर उलट धाडसी माणसाचे लक्षण आहे असे गांधीजी म्हणतात.शिवाय गांधीजींची अहिंसेची शिकवणुक सर्वांनाच पाळणे शक्य असते.त्यासाठी शरीरयष्टी,हत्यारे,साधनसामग्री यांची कशाचीच आवश्यकता नसते.त्यामूळे गांधीजींची ही अहिंसात्माक चळवळ भारतातील सामान्य जनतेत प्रचंड लोकप्रिय झाली.त्याचबरोबर गांधीजींनी सत्याला पण खुप महत्व दिले.ते म्हणतात की इतर सर्व गोष्टींपेक्षा माझे प्रेम अहिंसेच्या तत्वावर आहे.जर अहिंसेच्या तत्वाइतके कशावर माझे प्रेम असेल तर ते आहे सत्यावर.गांधीजी अहिंसा आणि सत्यामध्ये फ़रक बघत नसत.तर अहिंसा हे साधन आहे व सत्य हे साध्य आहे.त्यामुळे जर आपण साधनांची काळजी घेतली तर आपण साध्यापर्यंत पोहोचणारच यात काही शंका नाही असे गांधीजींचे मत होते.


आता मुख्य प्रश्न असा आहे की गांधीजींना कुठल्या परीस्थितीमध्ये हिंसा मान्य होती?म्हणजे एखाद्या ठिकाणी अन्याय होत आहे तिथे जर हिंसेशिवाय अन्याय रोखताच येत नाही तर हिंसा केलेली ठिक आहे का?यावर गांधीजींचे उत्तर आहे की हिंसा कुठल्याच ठिकाणी बरोबर नाही.गांधीजी फ़क्त एकाच परीस्थितीत हिंसा ठिक आहे ते सांगतात.ती परीस्थिती म्हणजे जर भित्रटपणा किंवा हिंसेतील एकाची निवड करायची असल्यास.गांधीजी म्हणतात अहिंसा हे धैयवान माणसाच लक्षण आहे ,भित्र्या माणसाचे नाही.भित्रटपणापेक्षा हिंसा बरी.पण कुठल्याही इतर ठिकाणि हिंसा त्यांना मान्य नाही.गांधीजींचा विरोध करताना त्यांची हिंसा हिटलर,स्टॅलिन यांच्यासमोर चालणार नाही असे म्हणतात पण गांधीजी म्हणतात की त्याही ठिकाणी अहिंसा हाच मार्ग आहे.गांधीजींनी ज्यु लोकांचा नाझी नरसंहार करत होती तेंव्हा सांगितले होते की ज्युंनी पण अहिंसात्मक मार्गानेच प्रतिकार करावा.ज्युंनी जर्मनीला सोडुन जाण्यास नकार द्यावा आणि त्यांच्याविरुध्द होणाया अन्यायासही विरोध करावा.वेळ पडल्यास स्वत:चा जीवही त्यांना अर्पण करावा.त्यामुळे कुठल्याही परीस्थितीत हिंसा गांधीजींना मान्य नव्हती.'यंग इंडीया’ मधील एका प्रकाशनात गांधीजींनी गुरु गोविंद सिंग,शिवाजी महाराज,राणा प्रताप,रणजित सिंग,लेनिन,डे वालेरा,केमालपाशा या सर्वांना 'misguided patriot' म्हटले होते.गांधीजींची हीच विचारसरणी भगत सिंग व इतर क्रांतिकारकांबद्दल होती.ते म्हणत की "भगत सिंगने हिंसेचा मार्ग देशभक्तीतुन घेतला.त्याच्या शौयापुढे आपण हजार वेळा नतमस्तक व्हावे पण त्याचा मार्ग चुकीचा होता.आपल्या देशात लाखो लोक दुर्बल आहेत.अशा ठिकाणी जर आपण न्याय खुनाच्या तत्वावर करणार असु तर आपली परीस्थिती फ़ार भयानक होईल.हिंसेचा धर्म आपण बनवल्यास आपलेच लोक आपल्याच अन्यायाचे लक्ष्य होतील."गांधीजींचा क्रांतीकार्याला विरोध एका अजुन कारणाने होता जो म्हणजे आपल्या देशाची मानसिकता.गांधीजी म्हणत की आपला देश म्हणजे तुर्की,आयरलंड किंवा रशिया नाहीये.त्यामुळे तिथल्या परीस्थितीत आणि आपल्या परिस्थितीत खुप फ़रक आहे.शिवाय क्रांतिकार्याला मास बेस नव्हता त्यामुळे ही क्रांति मासेस साठी काय करु शकेल असाही गांधीजींचा प्रश्न होता. याबाबत विचार केल्यास असे कळते की गांधीजी आपल्या अहिंसेच्या तत्वाबद्दल प्रमाणिक होते.हल्ली गांधीजींच नाव घेउन चालणारी माणसे त्यांच्या विचारांबरोबर प्रामाणिक नसतात.पण गांधीजी आपल्या पुर्ण अहिंसेच्या तत्वाशी प्रामाणिक होते.त्यासाठी इतर ऐतिहासिक नायकांच्या तत्वांना विरोध करणे गांधीजींनी टाळले नाही.पंजाबमध्ये शिख समुदायामध्ये गांधीजींनी व्यक्त केलेल्या गुरु गोविंद सिंगांच्या मताबद्दल नाराजी होती.गांधीजींना शिखांनी किर्पाण धारण करणेही आवडत नसे.

गांधीजींच्या मते अहिंसा हा मनुष्याचा स्थायीभाव असल्याने त्याने प्रश्न सुटतात तर हिंसेने प्रश्न अधिक बिकट होत रहातात्.त्याचबरोबर अहिंसेने मनुष्यात बदल होतो,मनुष्याचा आजार बरा होतो व तो अन्याय करणे सोडतो.अहिंसा मनुष्यामनुष्यामधले परस्परप्रेमाचे नाते पक्के करते.त्यामुळे ब्रिटीशांविरुध्द लढतानाही गांधीजींचे ब्रिटीश जनतेवर तितकेच प्रेम होते जितके भारतीय जनतेवर होते.या दृष्टीने विचार केल्यास गांधीजींची अहिंसेची विचारसरणी संपुर्ण जगासाठी आदर्श ठरते.सध्याचे असणारे अनेक जागतिक बिकट प्रश्न परस्पर सहकार्याने व परस्पर प्रेमाने सुटु शकतील असे वाटते.शिवाय गांधीजींचा अहिंसात्मकरीत्या सत्याग्रह करण्याचा मार्ग त्या काळातील परीस्थितीनुसार भारतीय जनतेस रुचणारा होता.त्यामुळे गांधीजींनी स्वातंत्र्याची चळवळ सामान्य जनतेपर्यंत नेली व त्या चळवळीला उदंड प्रतिसाद मिळवुन दिला.सशस्त्र लढ्याचा मार्ग आपल्या भारतीय जनतेला रुचणारा नव्हता असे आपण म्हणु शकतो.कारण त्याला आवश्यक असणारी त्यागाची भावना त्या काळातील सर्वसामान्य भारतीय जनतेत नव्हती.सावरकर म्हणतात की मातॄभुमिसाठीची लढाई म्हणजे सतीचे वाण आहे.पण गांधीजींचा मार्ग सोपा होता.कायद्याला विरोध करत २-४ लाठ्या खाण आणि जेलमध्ये जाण त्या काळातील सामान्य जनतेला जास्त सोप होतं. गांधीजींच्या अहिंसेबद्दल अजुन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की निर्बल आणि हतबल माणसाला त्या पध्दतीने अन्यायाचा प्रतिकार करण्याशिवाय दुसरा कुठला पर्यायच नाही.त्याचमुळे भगत सिंग्,स्वातंत्र्यवीर सावरकर व इतर क्रांतिकारकांनीही आपल्या तुरुंगवासात होणार्‍या अन्यायाविरुध्द अहिंसात्मक सत्याग्रहाचा व उपोषणाच्या मार्गाचा अवलंब केलेला दिसतो.म्हणजे गांधीजींच्या मार्गाचे जे कट्टर विरोधक होते तेसुध्दा दुसरा कुठला उपाय नसल्यावर त्याच गांधीजींच्या मार्गाचा अवलंब करतात.

गांधीजींच्या मार्गाचा एक मुद्दा हा की जर सरकार अन्याय करत असेल ,सरकारकडे कितीही मोठी शस्त्र असु देत पण जर संपुर्ण जनतेनीच सविनय कायदेभंग केल्यास सरकारला अन्यायी राज्य करणे अशक्य आहे. हे म्हणजे सरकारची शक्तीच काढुन घेतल्यासारखे आहे.तुम्ही काहीही कायदे करा पण आम्ही ते अन्याय्य कायदे पाळणारच नाही पण आम्ही तुमच्यावर हल्लाही करणार नाही.अशा परीस्थितीत सरकार काय करेल?पण जेंव्हा समाजच आपापसात रक्तपात करायला उठतो तेंव्हा अहिंसेची चळवळ कितपत यशस्वी ठरु शकते हाही प्रश्नच आहे.दुसरी गोष्ट म्हणजे हिटलर्,स्टॅलिन,लादेन यांच्यासारख्या कृर राज्यकर्त्यांसमोर हा मार्ग फारसा प्रभावी ठरेल असे वाटत नाही.कारण हे आपल्या मार्गावर एका मोठ्या विचाराने आलेले असतात्.त्यांच्या हिंसेमध्ये त्यांना अन्यायाचा लवलेशही दिसत नसतो.शिवाय अहिंसेचा मार्ग एखाद्या व्यक्तीमध्ये परीवर्तन नक्कीच घडवु शकतो पण पुर्ण समुहात परीवर्तन घडवु शकतो काय्?मला वाटत एकाच वेळी नाही घडवु शकत्.मग दहशतवादासारखी समस्या यातुन सुटु शकते काय?याचेही उत्तर बर्‍यापैकी नकारात्मकच आहे.कारण तुम्ही एका कसाबला बदलाल तर दुसरा निर्माण होईल आणि तो रक्तपात घडवील्.त्याला बदलाल तर अजुन एक उभा राहील.म्हणजे ज्या समाजावर अन्याय होतोय त्याला सतत रक्तपातच सहन करावा लागेल्.शिवाय तुम्हाला तुमचा शत्रु माहीत असल्यास त्याचे मनपरीवर्तन तुम्ही करु शकता पण तुम्हाला तुमचा शत्रुच माहीत नाही तर तुम्ही काय कराल?

परीस्थितीच्या अनुसार हिंसा
आपण एखाद्या परीस्थितीमध्ये हिंसा बरोबर आहे का याचा विचार करु.स्वातंत्र्यवीर सावरकर याच्याबद्दल आग्रही आहेत्.ते म्हणतात की 'सापेक्ष अहिंसा हा सद्गुण आहे तर पुर्णपणे अहिंसा हा गुन्हा आहे'.सावरकरांचे मत स्पष्ट होते.तुम्ही जोपर्यंत हिंसा करता आहात तोपर्यंत आम्ही त्याचा प्रतिकार हिंसेनेच करणार.ते म्हणतात की सद्गुण अथवा दुर्गुण हे मुलतः फक्त गुण असतात्.परिस्थिती त्यांना सद्गुण अथवा दुर्गुण ठरवते.त्यामुळे परिस्थितीनुसार ठरवा.सगळ जग शस्त्र टाकुन परस्परप्रेमास तयार असेल तर आम्हीही आमची राष्ट्रभक्ती टाकुन देउ व त्यांना मिठी मारु.पण जर सगळे जग लढाईसाठी तयार होत असेल तर आम्हीही स्वतःची तयारी करु.आम्हीच अन्याय सहन का करावा?तो होउ नये म्हणुन आम्ही शस्त्रास्त्रांची नक्कीच मदत घेउ.ते जेंव्हा आक्रमक आहेत तेंव्हा आम्ही आक्रमक न बनल्यास ती आत्महत्या ठरेल असे सावरकरांचे मत होते.आततायी बळ हा अत्याचार आहे तर आततायांचा प्रतिकार करणारे बळ हा नक्कीच सदाचार आहे.आता पुढे विचार करताना आपण शिवाजी महाराजांचा विचार करु.शिवाजी महाराजांनीही सशस्त्र मार्गानेच स्वराज्य उभारले व जनतेवरचा अन्याय दुर केला.शिवाजी महाराजांनी तलवार उचलली नसती तर औरंगजेबाविरुध्द स्वराज्य निर्माण करता आले असते का?मला वाटते की ते शक्य नव्हते.शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करुन एका आदर्श राज्याचे उदाहरण दिले.सामान्य जनतेचे जमिनदारीसारख्या अन्याय्य पध्दतीपासुन सुटका केली.परधर्माबद्दल आचार कसा असला पाहीजे,स्त्रीया,वृध्द्,धर्मपुरुष यांच्याशी आदर्श व्यवहार कसा असला पाहीजे हे ही दाखवले.मग अशा प्रकारचे स्वराज्य व सुराज्य निर्माण करण्यास शस्त्राची मदत घेतल्यास काय चुकले?माझ्यामते तो मार्ग बरोबरच होता.गुरु गोविंद सिंग पण परिस्थितीला अनुसरुन हिंसा करण्याचा पुरस्कार करतात.ते झफरनामामध्ये म्हणतात की 'जेंव्हा इतर सर्व मार्ग बंद होतात तेंव्हा शस्त्र हातात घेणे बरोबर आहे.'त्यामुळेच तलवारीलाच ते दुर्गा म्हणतात व तीच आपल्याला विजय प्राप्त करुन देईल असेही सांगतात्.

गुरु गोविंद सिंग तलवारीचा वापर आक्रमणासाठी करायचा नाही तर स्वसंरक्षणासाठी करायचा असे सांगतात.किर्पाण जे शिखांचा पाच ककारांसाठी आहे ते अहिंसेचे साधन मानले गेलेले आहे.कारण हिंसा थांबवणे हे अहिंसेचे सुत्र शिख धर्म मानतो.त्यामुळे दुर्बलावर होणारी हिंसा रोखण्यासाठी जेंव्हा इतर सर्व मार्ग असफल होतात तेंव्हा किर्पाणचा वापर शस्त्र म्हणुन करणे हीच अहिंसा आहे असे शिख मानतात.त्यामुळे सत्य व तलवार हे एकत्र असल्यास ते न्याय्य आहे व ती अहींसाच आहे .अन्यायाविरुध्द लढण्यासाठी तलवार वापरणे फक्त बरोबरच नाही तर तेच न्याय्य आहे असे गुरु गोविंद सिंग सांगतात.कृर व्यक्तींच्या अन्यायापासुन निर्बल जनतेचे शस्त्राच्या सहाय्याने रक्षण न केल्यास हिंसा वाढण्याची शक्यता जास्त असते.त्यामुळे तेथे शस्त्र उचलणे आवश्यकच आहे असेही गुरु गोविंद सिंग सांगतात.

निष्कर्ष??
दोन्ही बाजुंचा वस्तुनिष्ठ विचार केल्यास नक्की बरोबर काय आहे हे ठरवणे अवघड होते.कारण गांधीजींचे "An eye for an eye makes the whole world blind."हे मतही बरोबर आहे.शिवाय कुठली हिंसा न्याय्य व कुठली अन्याय्य यातील सीमारेशा वास्तविक हिंसाचाराचा विचार करताना पुसट होतात्.शिवाय आपल्याबरोबर आता ते धर्मगुरुही नाहीत.त्याचबरोबर एकच गोष्ट वेगवेगळ्या लोकांना न्याय्य अथवा अन्याय्य वाटु शकते.आता अमेरीकेने इराकवर हल्ला केला हे अमेरीकन्सना न्याय्य वाटते तर इराक्यांना अन्याय्य वाटते.एका जनसमुहाचा क्रांतिकारक दुसर्‍या जनसमुहाचा दहशतवादी असतो.शिवाय आधुनिक संहारक शस्त्रास्त्रांचा विचार केल्यास शस्त्रांचा प्रयोग हा कुणाना कुणावर तरी अन्याय करतच असतो.कारण या शस्त्रास्त्रांमुळे होणारी मनुष्यहानी अनेकदा सामान्य्,निर्बल जनतेचेच जीव घेताना दिसते.त्यामुळे तो हिंसाचार आपोआपच अन्याय्य ठरतो.सर्वच राष्ट्रांचे सम्हारक शस्त्र एक दिवस संपुर्ण मनुष्यजातीलाच संपवतील का??का उलट ही संहारक शस्त्रे युध्द रोखण्यासाठी उपयोगी ठरतील्.उदा.भारत्-पाक युध्द व्हायची परिस्थिती बर्‍याचदा आली पण दोघांनीही अण्वस्त्र वापरली जातील म्हणुन युध्द टाळले.मग असे असेल तर अण्वस्त्रांमुळे अहिंसेला मदत झाली असे म्हणावे का??आणि जर जगातले सर्वच राष्ट्र युध्दाची तयारी करत असतील तर आपणच युध्दविरोधी भुमिका घेउन असे काय साध्य होणार आहे??याने हिंसा तर थांबणार नाहीच पण आपला तोटाही होईल्.जर असे असेल तर आपणच ही वाट का धरावी??ओशो म्हणतात की युध्द हा मनुष्याचा स्थायीभाव आहे.युध्द हे नेहमीच मनुष्याबरोबर राहिलेले आहे.त्यामुळे युध्द चुकीचे आहे म्हणनेच चुक आहे.त्यामुळे न्याय -अन्याय याचा फारसा विचार न करता आपण युध्दाकडे सकारात्मक दृष्ट्या पहावे का??मला वैयक्तिक दृष्ट्या सर्व गोष्टींचा विचार केल्यास सावरकरांचे प्रतिकार म्हणुन हिंसेचे तत्व योग्य वाटते.वाचकांनी या शेवटच्या परीच्छेदामधील प्रश्नांची त्यांची उत्तरे जरुर कळवावीत.
चिन्मय कुलकर्णी
28 comments:

Anonymous said...

चिन्मय,
गांधीजींची अहिंसेची तत्व खरचच वन्दनीय आहेत असे मला वाटते. पण भारतात अनादीकालापासून चातुर्वर्ण्य व्यवस्था आहे (सध्या अस्तित्वात नाही) स्वतः भगवान श्रीकृष्णाने गीतेमधे चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे मह्त्व सांगितलेले आहे. त्यामुले अहिंसा हा जरी मनुष्य प्राण्याचा स्थायीभाव असला तरीही संकटकाली आपण स्वरक्षण करू शकलो नाही तर अशा जगण्यात तरी काय अर्थ आहे? स्वतः श्री समर्थ रामदास स्वामींनी शिवाजीराजांना याबाबत सुन्दर उपदेश केलेला आहे. स्वसंराक्षनार्थासाठी तसेच रयतेच्या रक्षनासठी वेळ प्रसंगी सर्व अनुभव घ्यावे लागतील असा समर्थांचा उपदेश खुपच सुन्दर आहे. तात्पर्य असे की अहिंसा जितकी महत्वाची आहे तितकीच हिंसा सुध्धा (जीवो जीवस्य जीवनं ) पण सगलेच प्रश्न जर अहिन्सेनेच सुटत असतील तर हिंसेचा प्रश्नच उरणार नाही.
- स्वानंद कुलकर्णी, नेवासा

Dr. Abhiram Dixit said...

swaanand ithe chaturvarnaachaa kay samband ?

Dr Dixit

Pankaj Patil said...

ya same question.
chaturvanacha kay sambandh?

Anonymous said...

अहिंसा एक चांगला उपाय आहे पण तो कधी, केव्हा, कोणासमोर वापरावा याला मर्यादा आहेत. इंग्रज तसे मुघलांच्या मानाने दयाळु होते म्हणुन गांधीबाबाना अहिंसेचा मार्ग आवडला. गुलामगिरीत राहायचे असेल तर अहिंसा चांगली आहे. इंग्रज जाण्यात अहिंसेचा वाटा होता हे अर्धसत्य आहे.

nikhil

Anonymous said...

अहिंसा आणि दहशतवाद
दहशतवादी अहिंसेचे तत्व पाळत नाही.
प्रतिहिंसेने दहशतवादी मरतील, दहशतवाद संपणार नाही.
भित्रटासारखे काहीही न करणे हे हिंसा करण्यापेक्षाही वाईट आहे. स्वसंरक्षणार्थ हिंसा करावी हि प्रतिकार न करण्यापेक्षा कधीही चांगकी.
दहशतवादाची मुळ कारणे शोधुन त्यावर उपाय करणे हाच एकमेव मार्ग असु शकतो.
बऱ्याचदा कारणे समाजाच्या आर्थिक प्रगतीशी निगडीत असतात, तसेच प्रबोधनाशीही.
आर्थिक प्रगती आणि सामाजिक प्रबोधनाची जवाबदारी व्यवस्थेवर असते, तसेच अंतर्गत सुरक्षेचीही.
आपली व्यवस्था साफ़ कोलमडलेली आहे. दहशतवादाचे short term solution अहिंसा नाही. ते long term solution आहे. short term मधे स्वरक्षणार्थ हिंसा व्यावहारीक आहे.

गांधी आणि अहिंसा

गांधींचे स्वत:चे मत असे होते की अहिंसा हे सध्याच्या युगात सगळ्या गोष्टींचा प्रतिकार करण्याचे साधन असुच शकत नाही. सध्याच्या युगात गांधींना स्थान नाही असेच ते स्वत: म्हणत. पण याचा अर्थ अहिंसेच्या तत्वाचा शक्य तिथे केलाच पाहिजे असा होतो आणि पर्याय नसेल तेव्हा शस्त्र घ्यावे असा होतो. हळहळु असा समाज निर्माण होइल जिथे हिंसेला स्थान नसेल.
स्वसंरक्षणासाठी आणि पुढील अधिक हिंसा टाळण्यासाठी शस्त्र हाती घ्यावे हे व्यावहारिक आहे असेच गांधींचे मत होते. पण प्रत्येक तत्कालीन व्यावहारीकदृष्ट्या योग्य गोष्ट, पुढील काळातही योग्य असेल असे नव्हे. आणि जेव्हा आपल्याला ती अयोग्य आहे याचे भान असते, तेव्हा तिला व्यावहारिकदृष्टया योग्य पर्याय निर्माण करणे हेही आपलेच कर्तव्य आहे.

दहशतवादाचा उल्लेख करुन गांधीची अहिंसा कशी कुचकामी आहे असा सतत घोष करत बसणे हे काही संघटनांच्या आणि विचारसरणीच्या लोकांचा प्रोपगंडा आहे, कारण त्यांना गांधींची credibility समाजातुन नष्ट करायची आहे. गांधी हे आजही असल्या विध्वंसक प्रवृतींचे नंबर एकचे शत्रु आहेत.

तळटीप:
ओशो काहीही म्हणोत, युद्ध ही मानवाची प्रवृत्ती असुच शकत नाही कारण मानवाचा स्पिरिच्युअल आणि एमोशनल कोशंट जनावरांपेक्षा खुप जास्त आहे.

शैलेंद्रसिंह

Anonymous said...

चिन्मय कुलकर्णी,
अतिशय संयमित लेख. गांधी हे नाव ऐकुन तळपायाची आग मस्तकात जाणार्या लोकांनी तर जरुर वाचलाच पाहिजे.

इथे link देन्या ऐवजी जर पू्र्ण लेख टाकला असतात तर अधिक उत्तम ठरले असते. कारण फ़ार कमी लोक link वर click करुन तो लेख वाचन्याचा प्रयत्न करतील. या कम्युनिटी वर तरी.

बाकी, मी समीर यांच्या मताशी सहमत आहे. References द्यायला हवेत. त्यामुळे लोक लिखाना बद्दल शंका घेउ शकत नाही. किमान पुस्तकांची नावे तरी द्यावीत असे वाटते. इतर लोक ती वाचतील तरी.

लेखाच्या निष्कर्षा बद्दल मला थोडी साशंकता आहे. पण असो. पुढे चर्चेतुन ते अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट व्हावे असे वाटते.

भारत

Anonymous said...

महात्मा गांधी एकाच धर्म जानत होते तो म्हणजे मानवधर्म ! पण मानव धर्म हाच राष्ट्रधर्म व्हावा अशी आज जगातल्या कुठल्याच देशाची स्तिति नाही. आपल्या परतंत्री मात्रुभुमिची तर नाहीच नाही,पण याबद्दल गाधिजिना दोष देण्यात काय आर्थ आहे ? ते स्वभावता संत होते त्याना क्रांति हवी होती,पण ती नुसती सामजिक,आर्थिक किव्हा राजकीय नको. मानवी मनातच क्रान्ति हवी हवी होती.

आज जगात सवर्त्र भोगाची भावना रुद्ध झाली आहे,मनुष्याचे मोठेपण त्याच्या सत्तेवर,त्याच्या सम्पतिवर,त्याच्या शक्तिवर मानले जात आहे. आणि आदर्श मानवी जीवनाची अंतिम मूल्य सेवेवर,त्यागावर आणि भक्तिवर अवलंबून असतात.अशी गांधीजीची भावना होती,सत्तेची मधानाता आणि सम्पतिची विषमता दूर झाल्याशिवाय मानवधर्माची जगात पूजा होणार नाही,हे ते पूर्णपने ओलखुन होते.

या दृष्टीने गांधीजीकड़े पाहिले की काहीज़नाना ते चुकीचे वाटत असले तरी कोट्यवधी जनतेच्या ह्रुदयात गांधींचे अधिराज्य अजुनही टिकून आहे

Anonymous said...

गांधींच्या अहिंसेवर वीर सावरकरांनी दिलेले हे समर्पक उत्तर -
"अहिंसाधर्म हा मनुष्यांच्या बाबतीत खरा असू शकतो, पशूंच्या बाबतीत नाही."
यानंतर फार काही बोलावे लागेल असे वाटत नाही.

नरेंद्र

Siddharth said...

गांधी आणि सावरकर
गांधी:- भारत वासीयांनो शत्रुवर प्रेम करा आणि त्यावर विश्वास ठेवा
सावरकर:- शत्रुवर प्रेम कींवा विश्वास टाकला जात नाही.

गांधी:- अहिंसेचा मार्ग स्विकारा, कोणी एका गालावर थोबाडीत मारली तर दुसरा गाल पुढे करा.
सावरकर:- स्वसंरक्षण करणे म्हणजे हिंसा नाही, मुर्ख हिंदुंनो, एक गळा कापला तर पुढे करायला दुसरा उरतच नाही.

गांधी:-मी एक हींदु आहे, आणि हिंदुंचे सगळे देव शांतीचा संदेश देतात.
सावरकर:- तुम्ही पोकळ हिंदु आहात, प्रभु श्रीरामाच्या हातात धनुष्य़ आहे, तर श्रीक्रुष्णाच्या हातात सुदर्शन चक्र .सज्जनांच्या रक्षणासाठी देवांनाही शस्त्र हाती घ्यावे लागतात.

गांधी:- शस्त्र हाती घेणे केंव्हाही वाईट, शत्रुशी लढायचे तर त्याच्या तत्वांशी लढा.
सावरकर:- युध्दात तत्व नव्हे तर तलवारी टिकतात व जिंकतात. सीमा ह्या तलवारीने आखता येतात तत्वांनी नाही.

गांधी:- तलवारी नकॊत,ह्रुदय परिवर्तनावर विश्वास ठेवा व शत्रुचे मन जिंका.
सावरकर:- ज्याने आपल्याला मारुन टाकायचे ठरवले आहे त्याचे मन जिंकता येत नाही. हे हिंदुंनो, अफजल खानाचे ह्र्दय परिवर्तन करता येत नाही त्याचे ह्रदय फाडावेच लागते

गांधी:- ???????
सावरकर:- तुमच्याच आहारी जाउन हिंदु ईतके दीन झालेत की ते आपल्या बायका मुलांचे रक्षण करु शकत नाहीत..ही फार शर्मेची गोष्ट आहे...

Anonymous said...

Hinsa ani Pratikar hya don vegalya goshti aahet, Jar swatahahun kona innocent manasachi or pranyachi keli tar ti hinsa, ani koni apalyavar anyay karat asel / apali hinsa karat asel ani apan pratikar kela tar tyala hinsa mhanata yenar nahi...
Jar KUTRA pisalala asel tar tyala thaar maravach lagata...

Bhagavan Shrikrishna hyani Geetet sangitala aahe ki, Adharma viruddh (apan aata ANYAY mhanu) ladhanyatach khara PURUSHARTH aahe...

Anyay sahan karane mhanaje swatahavar Anyay karane...

Akshay

Shailendra said...

The Times, on September 27, 1947, under the headline "Mr. Gandhi on 'war' with Pakistan" reported:
"Mr. Gandhi told his prayer meeting to-night that, though he had always opposed all warfare, if there was no other way of securing justice from Pakistan and if Pakistan persistently refused to see its proved error and continued to minimise it, the Indian Union Government would have to go to war against it. No one wanted war, but he could never advise anyone to put up with injustice. If all Hindus were annihilated for a just cause he would not mind. If there was war, the Hindus in Pakistan could not be fifth columnists. If their loyalty lay not with Pakistan they should leave it. Similarly Muslims whose loyalty was with Pakistan should not stay in the Indian Union."

Gandhi had immediately stated that the report was correct, but incomplete. At the meeting he had added that he himself had not changed his mind and that "he had no place in a new order where they wanted an army, a navy, an air force and what not".

http://nobelprize.org/nobel_prizes/peace/articles/gandhi/

Anonymous said...

anything extreme is evil. It may be violence of islam or non-violence of Gandhi. my personal view is, Gandhiji has a useless philosophy!! He became popular because Indian masses found it easiest way to indulge themselves in freedom struggle. I call Gandhi's extreme non-violence as useless and evil because it should be remembered that human beings too, though they have bigger brains, are just another species of organisms on our planet. In that case, i feel, some violence is obviously natural and forgivable than self-imposed non-violence!

Siddhesh

Anonymous said...

Gandhiji's philosophy had no logical value even at the time when our freedom has not been achieved.People joined his non-violent struggle because it was the only way of contributing towards the nation.When our enemy needs your everything, you must understand that you have to protect yourself and your wealth and the only way to preserve your valuables is to take a weopan against your enemy.Due to Gandhiji's non violent foolishness, A complete generation of 'YOUNG INDIA' has to live in Jail without any future.Although anuone cant support violence, the non violent mood of Gandhi is never acceptable.
"An eye for an eye makes the whole world blind." But still alloowing a person to make rest of others blind is not right. He should also know what pain one has to undergo when his eye is lost, so his eye should also be withdrawn or else he will get encouraged to go on others blind.
Crime gets only developed when no proper action (punishment to the criminal) is taken. But if you punish first one so hardly that another should not rise his head agaist you, then two eyes are gone, but peace is established.No matter wheather it is generated from your terror.
What I want to say at final is Gandhi's thoughts were completely unacceptable , full of cowardness and outdated at any time.
-Shashank Kulkarni

Anonymous said...

चिन्मय तुझा लेख फारच छान आहे.

मला तर सावरकरांचीच भुमिका पटते. जर समोरून कोणी हल्ला करत असेल तर त्याला तसेच उत्तर द्यायला लागेल. आणि आतंकवाद्यांना आपण अहिंसेच्या किंवा माफिच्या मार्गाने नेले तर काय होते याची फळे आपण भोगत आहोत. आज आपला देश संपूर्णपणे पो़खरला गेलेला आहे.गांधीजींच्या मार्गाने चालणारे केवळ मतांसाठी अहिंसेच्या मार्गाचे समर्थन करीत आहेत.

-अमित चिविलकर

Anonymous said...

Gandhi; according to me is a political Tolstoy. He was inspired by Tolstoy and he carried the story in his mind on the political theatre of India. Your article is nice and one can surely observe from the thoughts that u have put forward that for whole his life he kept on discoursing the philosophy but his leadership was a practical failure. Savarkar is no different than him. They both were great philosopher now we all can fight who is rt and wo is wrong. The real need then was of a AWARE LEADERSHIP and that need is there till now. Gap hasn't been filled yet. Konacha barobar ahe tar uttar "Neti Neti" asa ahe. India still seeks that elusive leader some one like Shivaji or some one like Chanakya.
- Omkar Darvekar

Anonymous said...

तुज़े अभिनंदन. छान लेख लिहिला आहेस तू. पण शेवटी तुला बर्‍याच प्रश्नांची उत्तरे समाधानकारक मिळाली नाहीत असे वाटते. त्यामुळे मी तुज्या लेखावर मत मांडण्याचा प्रयातना करतो. आपण प्रत्येक मुद्द्यावरून चर्चा करूयात.
गांधींचा सत्य आणि आम्हिसेचा आग्रह हा त्यांच्या वैयक्तिक प्रेरणेवर आधारलेला होता अस तू लिहिल आहेस ते बरोबर आहे. तो मार्ग बहुसंख्य लोका ना अवलंबण्यासारखा होता हेही बरोबर आहे. पण गांधीच्या आधी लोक ब्रिटीश सत्तेविरुद्धा गप्प होते अस समजायाच कारण नाही कारण मुळात गांधीचा उदय हा टिळकांच्या मृत्यूनंतर ज़ाला. त्यामुळे टिळकणी १९२० पर्यंत लोकांमधे जी जागृती घडवून आणली होती तिचा फायदा गांधीना आपली राजकीय कारकीर्द घडवण्यासाठी आनायसेच ज़ाला. शिवाय सावरकरांना घडलेली शिक्षा यामुळे भारतीय राजकारणात जी पोकळी तयार ज़ळी होती त्या मुळे आणि त्यांच्या आफ्रिकेतील यशस्वी आंदोलना मुळे त्यांचा जम इथे बसला. त्यामुळे अहींसेबद्दल जी त्यांची मते होती ती त्यानी साहजिकच जम बसल्यानंतर लोकांसमोर प्रकर्षाने आणली. त्याना भारताच्या सडगुणविकरतीची ओळख तर होतीच त्यामुळे त्यांच्या मतंना देवात्वा पर्यंत जाणे सोपे ज़ले आणि याचा प्रचंड फायदा त्यानी राजकीय जम बसवण्यासाठी वेळोवेळी करून घेतला हे आपल्याला काळजीपूर्वक निरीक्षणातून दिसतेच. याला तत्कालीनभारतीय प्रसिद्धुी मध्यमेही तितकीच जबाबदार ठरली. आणि राजकीय फायदा हा पूर्णा प्रमनीकटेतून घेता येत नसतो. त्यामुळे गांधीची प्रमणिकटा ही त्यांच्या तत्वणा नसून राजकीय वर्चस्वाच्या भावनेला होती हे सिद्ध होते. सत्य आणि अहिंसा या दोन्ही गोष्टी गांधीजींची अध्यात्मिक उंची दाखवतात, राजकरणपतूत्व नव्हे.
त्यामुळेच जेव्हा गोलमेज परिषदेचा उल्लेख होतो त्यावेळेस गांधींच्या पोशाखाचे जास्त कौतुक होते, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताची भूमिका गांधीकडून किती प्रभावीपणे मांडली गेली याचे नव्हे. कारण याविषयीचे प्रभुत्व गांधिकडे होते याचा कोणताही पुरावा देता येत नाही. मुळात एखाद्या देशाचे स्वातंत्र्य ही पूर्णपणे राजकीय गोष्ट आहे आणि त्याचे समाधान गांधीच्या मोक्ष तत्वदण्यानने कधीच होत नसते. कारण गांधीची तत्वे ही समाजाला आणि देशाला त्याच्या संपूर्ण शान्तीच्या काळात उपयोगी होऊ शकतात संघर्षमधे नाही. कारण ही तत्वे वैयक्तिक जबबदारीच्या भावनेतूनच पार पडली जातात देशाच्या अन्यायकारक शासनाला जबाब देण्यासाठी याच प्रभावीपणे उपयोग होऊ शकत नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळेच देशाचे सौरक्षण आणि सेनेचे धोरण याबाब्त गांधीनी कधीच ठोस भूमिका घेतली नाही उलट सावरकारांवर टीका करून या मुद्द्याला यशस्वी बगल दिली.
शेवटी या लेखाचे समाधान यातच आहे की तुम्ही जर एखाद्या समुदायाचे प्रतिनिधी म्हणून नेतृत्व करत असलात तर तुमचे निर्णय हे त्या समुदायालाच कल्याण कारक असणे गरजेचे आहे त्या निर्णयांमुळे इतर समुदायांचे काय होईल हा विचार नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करतो. कारण जो जे वांछील तो ते लाभो हा विचार एखादा संतच आचरणात आणू शकतो राजकीय पुढारी नव्हे.
आणि गांधीनी संत म्हणून राहण्यात आमची काहीच हरकत नाही. पण संताची भूमिका राजकारणा नंतर येते हे आपण लक्षात घेतले पाहिजे. याच दोन्ही भूमिकांमधे गांधीची नेहमीच तारांबळ उडाली आणि ही तारांबळ दुर्लक्षित होण्यासाठी त्यानी विनाकारण आत्यंतिक आग्रहातून उपास वगैरे फार्स वेळोवेळी केले आणि याची किंमत देशाला वेळोवेळी मोजावी लागली. त्यामुळे मला असे म्हणावेसे वाटते की गांधीची धोरणे ही शांतीसाठीचे नोबेल प्राइज़ मिळवण्यासाठीच उपयोगी आहेत राष्ट्राची धुरा संभाळण्यासाठीचा कना ती बनू शकत नाहीत. शेवटी दोन फटके खाऊन पुढे पुढे करणारेच आपलयइथे स्वातंत्र्य सैनिक म्हणवले गेले आणि जात आहेत. मेणबत्तीवर हात ठेवून प्रतिडण्या करण्याची कृती भावनात्मक हिंसा म्हणून हिणवली गेली हे ऐतिहासिक सत्य आपल्यासाठी गांधीनी शिल्लक ठेवले आहे.

जय हिंद !!!!

Sagar

Anonymous said...

chhan lihila aahes

onkar

Anonymous said...

डॉ. दिक्षित आणि पंकज,
तुम्ही दोघांनी प्रश्न विचारलात की इथे चतुर्वर्न्याचा काय संबंध? बहुदा तुम्ही माजा अभिप्राय नीट वाचलेला दिसत नाही. चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा इथे संबंध आहे. चतुर्वार्नापैकी एक वर्ण म्हणजे "क्षत्रिय" की जो प्रजेचा रजा असतो, तो प्रजेचे पालन पोषण आणि मुख्यतः संरक्षण करतो. प्रजेला शत्रुपासून अभय देतो. अन्यायाविरुद्ध किंवा शत्रूविरुद्ध लढण्यास उद्युक्त करतो नव्हे तर शिकवतो. त्याचे मुख्य कर्तव्य असते ते प्रजेचे संरक्षण करणे, स्वतःचा क्षत्रियधर्मं पालणे. या हेतूने मी अभिप्रायात वर्णव्यवस्थेचा उल्लेख केलेला आहे.
तुमच्या प्रश्नावर एवढे उत्तर पुरेसे आहे असे मला वाटते? अजुन खुलासा हवा असल्यास सांगावे.

- स्वानंद कुलकर्णी

Anonymous said...

इतर अभिप्रायांबद्दल...................!
या लेखात आपण एक व्यक्तीचा परामर्ष न घेता त्याच्या विचारांचा परामर्ष घेतलेला आहे.
एखादी व्यक्ती कशी होती आणि तिने कसे असायला पाहिजे होते या गोष्टींचा उहापोह करत बसण्यापेक्षा त्या व्यक्तीचे "विचार" कसे होते आणि ते सर्वांवर कसे प्रभाव पाडू शकतात अथवा ते किती महत्वाचे आहेत ते पहावे. "व्यक्ती आणि विचार" यामध्ये व्यक्ती(शरीर) मर्त्य आहे पण त्या व्यक्तीच्या विचारांना कधीही मरण नाही. ती व्यक्ती विचाररुपाने वर्षानुवर्षे जिवंत राहते. म्हणुन व्यक्तीवर चर्चा करण्यापेक्षा त्या व्यक्तीच्या विचारांवर केलेली चर्चा जास्त उपयोगी ठरेल असे मला वाटते.

- स्वानंद कुलकर्णी

Rucha Vivek said...

kharach khup chhan lekh ahe
Savarkaranchi bhumika mala aavadli

he suddha apan visarta kama naye, ki Mahabharatat Arjunane aplyach bhavandanviruddha dhanushya uchchalla hota....to laddha dharm ani adharm yacha viruddha hota
tyla apan hinsa mhanu shakat nahi...pann jevha dharmachya navavar kapakapi hote, ujach lahan mulanchi hatya, nirdosh mansanchi hatya..... hi hinsa nakkich barobar nahi
Savarkar je mhanale te sarv tyanni LOGICALLY vichar karun mhantle ahe...kadachit aajchya jagat LOGICACH rahile nahi

majhya mhananyacha uddeshya asa, ki hinsela maryada aste....
NON-VIOLENCE IS NOT THE EASY WAY, BUT IT IS NOT THE ONLY WAY!!
aapla ladha konaviruddha ahe, tyachi manovrutti....aaplyavar kasla atyachaar ghadat ahe, ani tyaviruddha kay karta yete ha vichar mahatvacha ahe
sahan karnyachi hi maryada aste.

shatrushi prem karne he ektar yogya nahi, ani te shakkya nahi

tyapeksha he mhanane yogya asave ki namrata ani yukti, shaktipeksha shresht
yacha artha asa hot nahi ki shatru atyachar karat ahe, tyavar prem kara ani sagla sahan kara
tyavar maat karyas buddhi ani mansik shakti lagtech, hinsechi aso kinva ahinsechi


rucha

Anonymous said...

लोक गांधींना "अहिंसा" या मथळ्याखाली stereotype करतात, हा मूळ Problem आहे. ते बघत नाहीत कि त्यांचा हिंसेला विरोध नसुन, अन्यायाला निर्भीड्पणे विरोध करणे हे त्यांना अभिप्रेत आहे. अहिंसा हे निर्भिड व्यक्तीसाठी आहे , भ्याडांसाठ नाही.

गांधींच्या बद्दल कित्येक लोकांच्या मनात फ़ार गैरसमज आहेत. त्याचे कारण त्यांचे विचार फ़ार Complicated आहेत, सर्वसामान्य माणसाला समजण्यासाठी. त्यासाठी विचारांची प्रगल्भता, वस्तुनिश्ठपणा, माणुसकीची जाण या गोष्टी फ़ार आवश्यक आहेत. जर कुणाला काही पूर्वग्रहदोषित मतांमुळे गांधी समजुन घ्यावे, असे वाटतच नसेल .. तर त्याला गांधी समजणे केवळ अशक्य आहे. त्याच बरोबर, नुसतं गांधी समजणे हे सुद्धा पुरेसे नाही. ते स्वत: अंगिकारणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे.

आण्णा हजारे, बंग दांपत्य, बाबा आमटे अशी कितीतरी उदाहरणे आहेत ... ज्यांनी अजुनही गांधींना जिवंत ठेवले आहे. किरण बेदी यांनी जेल मध्ये गांधीगिरी यशस्वी करुन दाखवली.. गुन्हेगारांमध्ये बदल घडवुन दाखवला.

अहिंसा, सत्याग्रह ही नुसती शस्त्रे नाही आहेत .. तर हीच शस्त्रे वापरुन लोक जास्तीत जास्त प्रमाणात एकत्र येवु शकतात, हे शस्त्र आहे एकीचं ! हिंसा, क्रांतिकारी मार्ग यांनी काही लोक एकत्र येवु शकतात...सगळे नाहीत.

भारत-पाक संघर्ष आता गांधीमार्गाने सोडवण्याच्या पलीकडे गेला आहे .. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला स्व-संरक्षणार्थ हिंसा हे तत्व इथे वापरावे लागेल. कारण हा राष्ट्रा - राष्ट्रातला संघर्ष आहे. पण आपल्या देशांतर्गत समस्या उदा. हिन्दु-मुस्लिम संघर्ष, जातिंमधले संघर्ष .. इथे आपल्याला गांधीगिरीच वापरावी. तेच आपल्या देशाच्या द्रुष्टीने सोयिस्कर राहील. अन्यथा आ्पल्या देशाची अवस्था सध्याच्या पाकिस्तान, सोवियत युनियन यांच्या सारखी व्ह्ययला फ़ार वेळ लागणार नाही.

आजची परिस्थिती पाहता .. आपण पाकिस्तान, सोवियत युनियन यांच्या नक्शे -ए-कदम वरच चालत आहोत, असे मला वाटते.
लोक गांधींना "अहिंसा" या मथळ्याखाली stereotype करतात, हा मूळ Problem आहे. ते बघत नाहीत कि त्यांचा हिंसेला विरोध नसुन, अन्यायाला निर्भीड्पणे विरोध करणे हे त्यांना अभिप्रेत आहे. अहिंसा हे निर्भिड व्यक्तीसाठी आहे , भ्याडांसाठ नाही. मला वाटतं, चिन्मय तु जो प्रश्न विचारला आहे... त्याचं उत्तर मला वाटतं ’गांधी’ समजुन घेण्यात आहे.

गांधींच्या बद्दल कित्येक लोकांच्या मनात फ़ार गैरसमज आहेत. त्याचे कारण त्यांचे विचार फ़ार Complicated आहेत, सर्वसामान्य माणसाला समजण्यासाठी. त्यासाठी विचारांची प्रगल्भता, वस्तुनिश्ठपणा, माणुसकीची जाण या गोष्टी फ़ार आवश्यक आहेत. जर कुणाला काही पूर्वग्रहदोषित मतांमुळे गांधी समजुन घ्यावे, असे वाटतच नसेल .. तर त्याला गांधी समजणे केवळ अशक्य आहे. त्याच बरोबर, नुसतं गांधी समजणे हे सुद्धा पुरेसे नाही. ते स्वत: अंगिकारणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे.

आण्णा हजारे, बंग दांपत्य, बाबा आमटे अशी कितीतरी उदाहरणे आहेत ... ज्यांनी अजुनही गांधींना जिवंत ठेवले आहे. किरण बेदी यांनी जेल मध्ये गांधीगिरी यशस्वी करुन दाखवली.. गुन्हेगारांमध्ये बदल घडवुन दाखवला.

अहिंसा, सत्याग्रह ही नुसती शस्त्रे नाही आहेत .. तर हीच शस्त्रे वापरुन लोक जास्तीत जास्त प्रमाणात एकत्र येवु शकतात, हे शस्त्र आहे एकीचं ! हिंसा, क्रांतिकारी मार्ग यांनी काही लोक एकत्र येवु शकतात...सगळे नाहीत.

भारत-पाक संघर्ष आता गांधीमार्गाने सोडवण्याच्या पलीकडे गेला आहे .. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला स्व-संरक्षणार्थ हिंसा हे तत्व इथे वापरावे लागेल. कारण हा राष्ट्रा - राष्ट्रातला संघर्ष आहे. पण आपल्या देशांतर्गत समस्या उदा. हिन्दु-मुस्लिम संघर्ष, जातिंमधले संघर्ष .. इथे आपल्याला गांधीगिरीच वापरावी. तेच आपल्या देशाच्या द्रुष्टीने सोयिस्कर राहील. अन्यथा आ्पल्या देशाची अवस्था सध्याच्या पाकिस्तान, सोवियत युनियन यांच्या सारखी व्ह्ययला फ़ार वेळ लागणार नाही.

आजची परिस्थिती पाहता .. आपण पाकिस्तान, सोवियत युनियन यांच्या नक्शे -ए-कदम वरच चालत आहोत, असे मला वाटते.

-- भारत माझा देश

Anonymous said...

गांधींचा हिंसेला विरोध ?

गांधी स्वत: मान्य करतात कि क्रांतिकारी मार्गाने अथवा हिंसेने आपल्याला कदाचित १० वर्षे अगोदर स्वातंत्र्य मिळालं असतं.

पण त्यांच्या मते आपण फ़क्त ब्रिटीशां विरुद्ध लढत नव्हतो तर आपण आपल्या मुळ समस्या गरिबी, बेकारी, अस्प्रुश्यता यांच्या विरुद्ध सुद्धा लढत होतो. हिंसक मार्गाने मिळालेल्या स्वातंत्र्या मध्ये सत्ता काही ठराविक लोकांच्या हातातच राहिली असती. समाज एकत्र राहिला नसता. आणि त्यामुळे आपल्या मुळ समस्या आपण सोडवु शकलो नसतो, कित्येक लोकांवर होणारा अत्याचार हा तसाच चालु राहिला असता.

अहिंसा आणि हिंसा या मध्ये त्यांनी अहिंसा निवडलं. कारण त्यांच्या मते भारतासाठी ते सर्वात जास्त सोयिस्कर होतं.

आणखी एक कारण त्यांच्या Upbringing मध्ये आहे. त्यांचा जन्म गुजरात मध्ये झालेला. तिथे जैन धर्म प्रमुखत: आहे. आणि हिंदु, जैन या धर्मांचं मुळ हे अहिंसा हेच आहे.

गांधींचे धर्म, धर्मांतर या बद्दलचे विचार सुद्धा फ़ार प्रेरणादायक आहेत ..आणि आपल्या त्यामुळे असलेल्या कित्येक समस्या त्या विचारांनी सोडवता येतील. असो. हा वेगळा विषय आहे, पण लोकांनी गांधींचे विचार वाचावेत.

"Mind of Mahatma Gandhi" हे प्रभु आणि राव यांचे पुस्तक सर्वांनी जरुर वाचावे असे आहे.

-- भारत माझा देश

Unknown said...

ज्या लोकानां गांधींचे विचार आजच्य युगात बरोबर वाटत नाहित, त्यानिं हे जग बदलण्याचे प्रयत्न करावेत, जेणेकरून आपण अहिंसा व प्रेमाने एकत्र, विश्वचि माझे घर बनवून राहू शकुत...

Unknown said...

Gandhi gela hindustanachi vaat laun gela. aajche terririsom ,mhanaje tya kalatala to religious group. jyana hya bitrani dhon tukade dile pakistan ani banglades. tevach he sarva religious dahshatwadi haklun dile pahije hote. te tya gandhi ani neharula kahi jamale nahi. aata he lok mahne 150 million zale te aata parat don tukade magnar ase apun karat gelo tar sagalya hinduna andman nicobar betavar rahayala zave lagel.
mala phakta evade mhanache aahe ki ha gandi nasta aani ekada shivaji asta tar bara zale asate.
me pach varshapasun gulf madhe tantra abhiyanta mhanun kam karto aahe pun mala hindu sodun konihi Indian betala nahi ekade.
tyamulecha mhanato soda gandhi vati ani lada dya nahitar aaj hotel udya he rligious dahashatvadi gharat ghustil
Jay hind!

- ek Hindustani

Anonymous said...

जेंव्हा आपण गुलाम असतो आणी गुलामगिरीतून मुक्त होण्याची इच्छा असते तेंव्हा अहिंसा अत्य़ंत निरुपयोगी ठरते.

जर शत्रु तुल्यबळ असेल तेंव्हा अहिंसेचा पर्याय उपयोगी ठरेल अर्थात त्यासाठी शत्रुलाही अहिंसा मान्य हवी.

नवरा व बायको, ईग्लंड व भारत अशी तुलना कशी काय होउ शकते? गांधींना जे काही प्रयोग करायचे होते ते आश्रमापुरतेच मर्यादित ठेवायला हवे होते. भारताच्या भविष्याशी असा अहिंसक अध्यात्मिक खेळ करायला नको होता.

Unknown said...

दहशतवादाचा उल्लेख करुन गांधीची अहिंसा कशी कुचकामी आहे असा सतत घोष करत बसणे हे काही संघटनांच्या आणि विचारसरणीच्या लोकांचा प्रोपगंडा आहे, कारण त्यांना गांधींची credibility समाजातुन नष्ट करायची आहे. गांधी हे आजही असल्या विध्वंसक प्रवृतींचे नंबर एकचे शत्रु आहेत.
... you are right Shailendrasinh, ...I have question for those people,... if the down-troden people like Dalits who once were oppressed by Savarnas, want to take revenge, & start taking violent activities, what would be their ( above people like Sawarkar & their supporters ) reaction ? ... will they appreciate Dalit's violence ?

Anonymous said...

सावरकरांनी गांधीना ऊद्देशुन लिहलेल्या पुस्तकातील ही काही वाक्ये व त्याला सत्य हे माझे ऊत्तर तुम्हाला कोणते पटते ते पहा

स्वा. विनायक दामोदर सावरकर ह्यांच्या गांधी गोंधळ मधील काही निवडक विचार
वाचा आणि विचार करा कुठली मते धर्माला धरून आहेत, आपण सर्व हिंदूंनी नक्की काय शिकायला पाहिजे, कोणाचे ऐकायला पाहिजे आणि नक्की कसे वागले पाहिजे
गांधी, सावरकर , सत्य
आपणास कोणता पटतो ते पहा

गांधी :- भारत वासीयांनो शत्रुवर प्रेम करा आणि त्यावर विश्वास ठेवा.

सावरकर :- शत्रुवर प्रेम कींवा विश्वास टाकला जात नाही.

सत्य :- शत्रूवर विश्वास ठेवला नाही आणि विनाकारण हिंसा करत राहिलो, तर दोघेही संपाल…

गांधी :- अहिंसेचा मार्ग स्विकारा, कोणी एका गालावर थोबाडीत मारली तर दुसरा गाल पुढे करा.
सावरकर :- स्वसंरक्षण करणे म्हणजे हिंसा नाही, मुर्ख हिंदुंनो, एक गळाकापला तर पुढे करायला दुसरा उरतच नाही.

सत्य :- स्वसंरक्षण म्हणजे कुरापती काढणे किंवा सतत ज्वलंत विचार बोलून दाखवून शत्रू पैदा करणे नाही… तोंड बंद ठेवाल आणि चांगले विचार जगाला द्याल तर शत्रू निर्माणच होणार नाहीत.
मंडेलापासुन प्रकाश बाबा आमटे पर्यंत पुर्ण जगात कोणते विचार स्वीकारले

गांधी :- मी एक हींदु आहे, आणि हिंदुंचे सगळे देव शांतीचा संदेश देतात.
सावरकर :- तुम्ही पोकळ हिंदु आहात, प्रभु श्रीरामाच्या हातात धनुष्य़ आहे, तर श्रीक्रुष्णाच्या हातात सुदर्शन चक्र.सज्जनांच्या रक्षणासाठी देवांनाही शस्त्र हाती घ्यावे लागतात.

सत्य :- बुध्द,मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला, महावीर, मलाला, प्रकाश बाबा आमटे आंग सान स्यू की आणि अश्या कोट्यावधी लोकांनी गांधीजींचा मार्ग अवलंबला…. लादेन, गोडसे,ISIS, लश्कर ए तयबा, तालिबान ,इ. भक्तांनी किती प्रगती केली?…. विचार करा जिथे चर्चेने प्रश्न सोडवले जावू शकतात तिथे चर्चा अवश्य करावी… हनुमान, अंगद यांना श्रीरामाने चर्चेस पाठवले होते… श्रीकृष्ण शिष्टाई… शस्त्र उचलणे हा शेवटचा पर्याय असतो… आता धनुष्य़, तलवारी नाहीत अणुबॉम्ब आहेत… घ्या हातात आणि टाका एकमेकावर…

गांधी :- शस्त्र हाती घेणे केंव्हाही वाईट, शत्रुशी लढायचे तर त्याच्या तत्वांशी लढा.
सावरकर:- युध्दात तत्व नव्हे तर तलवारी टिकतात व जिंकतात. सीमा ह्या तलवारीने आखता येतात तत्वांनी नाही.
सत्य :- जग हे असिमीत संधीने व्यापलंय स्वत:ला सीमा आखून घेवून बंदिस्त करू नका… ओबामा हा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होवू शकतो आणि उद्या एखादा भारतीय पण होईल… आपण २१व्या शतकात जगतोय अठराव्या नाही… मागासलेले विचार सोडा… उज्वल भविष्याकडे वाटचाल करा

गांधी :- तलवारी नकोत, हृदय परिवर्तनावर विश्वास ठेवा व शत्रुचे मन जिंका.
सावरकर :- ज्याने आपल्याला मारुन टाकायचे ठरवले आहे त्याचे मन जिंकता येत नाही. अफजल खानाचे हृदय परिवर्तन करता येत नाही त्याचे हृदय फाडावे लागते.

सत्य :- वाईट काम करणाऱ्या व भेकड लोकांनाच कुणीतरी आपल्याला मारेल याची सतत भीती असते…. आज अफजलखान निर्माण होतील कसे? ज्या देशात धार्मिक लढाया लढल्या जातात तिथेच असे लोक तयार होतात…. आपल्या देशाला युरोप अमेरिका बनवायचे आहे की धार्मिक दंगली करून इराक, सिरीया इ. बनवायचे आहे?
(सावरकर विचार जर एवढेच प्रिय आहेत तर का महामहीम मोदी प्रत्येक भाषणात गांधीजीचाच का ऊल्लेख करतात?
व का प्रत्येक देशातील राष्ट्राध्यक्षाला Geeta according to Gandhi हे पुस्तक भेट देतात?
द्यायची ना Geeta according to sawarkar भेट ?

का जगभर जाऊन सांगतात कि गांधीजी आजच्या युगात खरे आदर्श आहेत म्हणून?)

गोडसेनीे सशस्त्र वा अहिंसक कोणत्याही आंदोलनात भाग घेतला का? नाही
फक्त ज्वलंत भाषण व लिखाण करून लोकांना एकमेकांविरूध्द भडकवणे याला शौर्य म्हणतात का?

सुभाषचंद्र बोस , महात्मा गांधी व भगतसिंग या तिघांनीही स्वातंत्र्यासाठी सर्वस्व त्यागले ? कोठेही धार्मिक भावना भडकवल्या नाहीत

सुभाषचंद्र बोस च्या आझाद हिंद सेनेत गांधी व नेहरू टुकडी होती

भगत सिंगांनी धर्म का सोडला व नास्तिक का झाले हे जरा तपासुन पहावे.त्यांनी कधी कोणाला धर्माच्या नावावरून भडकवले का?त्यांचे "मै नास्तिक क्यों हुँ" पुस्तक वाचा

जातिवादी लोकांनी धर्माच्या नावावर लोकांना भडकवणे बंद करावे
आता या पैकी आपल्याला कोणता विचार पटतो तो आपण स्वीकारावा.
शेवटी तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
….
सत्य :- लक्षात ठेवा तोडणे खूप सोपे असते… ज्वलंत विचार व ईर्ष्या करणे जरी सोपे असले तरी त्याने समोरच्याचेही नुकसान होते व आपलेही

Dr.Chinmay Kulkarni said...

महाशय मी कोठेही गोडसे समर्थन केलेले नाही. तुम्ही लिहिलेल्या 'सत्य' शीर्षकाखालील विचार अतिशय उथळ आहेत.

शत्रूवर विश्वास ठेवल्याने चीन युध्दात भारताची नाचक्की झाली. त्याच कारणांनी कारगिल युद्द झाले.
युरोप- अमेरीकेनी जितक्या लढाया लढल्या आहेत तितक्या धर्मांदानी लढलेल्या नाहीत.
गांधीजींना लोक आदर्श मानतात पण फार कमी लोक त्यांच्या विचारांप्रमाणे वागतात. माझ्या माहितीत एकही देश नाही जो गांधीवादा किंवा तु लिहिलेल्या 'सत्य' प्रमाणे चालतो.

What is 'ideal' and what is 'practical' are two entirely different things.